अनेकदा आपल्या आसपास अपघात घडत असतात पण असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा कोणीतरी अनोळखी व्यक्ती नकळतपणे दुसऱ्याचे प्राण वाचवते. असे योगायोग क्वचितच कॅमेऱ्यामध्ये कैद होतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक घटना चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओ केरळमधील एका बस मधील आहे. बसमधून तोल जाऊन पडणाऱ्या तरुणाचे प्राण एका कंडक्टरने वाचवले आहेत. ही घटना इतकी आश्चर्यकारक आहे जी पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक बस सुसाट वेगाने रस्त्यावरून धावत आहे. कंडक्टर दरवाज्या जवळील सीटला टेकून उभा आहे आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांचे तिकीट काढत आहे. तो तिकीट काढत असताना अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबल्याने दरवाज्यात उभ्या असलेल्या तरुणाचा तोल जातो आणि तो बसमधून खाली पडणार असतो पण बस कंडक्टर पटकन त्याला हात देतो. तरुणाला कंडक्टरने वेळीच हात दिल्यामुळे तो बसच्या बाहेर पडत नाही. कंडक्टरच्या मदतीने तो पुन्हा बसमध्ये नीट उभा राहतो. कंडक्टरच्या प्रसंवधानामुळे तरुणाचा जीव वाचतो पण हे सर्व इतक्या पटकन घडते की नक्की काय घडले कोणालाही समजत नाही. व्हिडीओमध्ये कंडक्टरकडे पाहिले तर तो नेहमीप्रमाणे काम करत आहे आणि तरुणाला इतक्या अलगदपणे हात देतो. तरुणाला हात देताना कंडक्टर साधे मागे वळूनही बघत नाही जणू त्याला माहित होते की आता तो पडणार आहे. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील असल्यासारखे वाटते.

हेही वाचा – “त्याला जे कळलं ते…!” रस्ता ओलांडताना कुत्र्याने पाळला वाहतुकीचा नियम, Viral Videoने जिंकले नेटकऱ्यांचे मन

कंडक्टरने हस्तक्षेप केला नसता तर बसच्या चाकाखाली प्रवासी तरुण चिरडला गेला असतेा. व्हिडिओ X (पूर्वीचे Twitter) वर सामायिक केले गेले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ३,०७,००० व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्टबरोबर ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “केरळ २५ व्या इंद्रिय असलेल्या बस कंडक्टरने एका व्यक्तीला बसमधून पडण्यापासून वाचवले.”

हेही वाचा – “स्वत:च घर गळत असूनही पावसाची वाट पाहतो तो शेतकरी!”, पावसासाठी कवितेतून पांडुरंगाला घातलं साकडं; Viral Video बघाच

कमेंटमध्ये एका वापरकर्त्याने “घरी पोहोचल्यानंतर कंडक्टर असे लिहिले की, स्पायडर-मॅन स्वत:च्या हाताकडे पाहत असल्याचे चित्र पोस्ट केले जेव्हा त्याला समजले की, त्याच्याकडे शक्ती आहे असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर आहेत

दुसरा व्यक्तीने कंडक्टरला, “देसी स्पायडरमॅन” म्हटले.

तिसरा म्हणाला,”तो व्यक्ती खरचं रजनीकांतसारखा आहे” आणखी एकाने गंमतीमध्ये म्हटले, बापरे, कंडक्टर पैसे मोजत आहे त्याने पडणाऱ्या व्यक्तीकडे डुंकूनही पाहिले नाही. “पैसे दिल्याशिवाय उतरायचे नाही” असे म्हणत असावा.

अनेकांनी कंडक्टरचे कौतूक केले आहे.