रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केल्यानंतर तेथील लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये बॉम्बस्फोट सुरू आहेत. यादरम्यान, कीव येथे राहणाऱ्या एका कुत्र्याने भारताकडे मदत मागितली आहे. खरंतर हा कुत्रा केरळच्या कोची या शहरात राहणारा आहे आणि त्याने भारताकडे स्वतःला वाचवण्यासाठी विनंती केली आहे. कुत्र्याने याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
चपाती नावाच्या या कुत्र्याने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. या कुत्र्याने आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, “प्रिय भारत माते, माझ्या कुटुंबाप्रमाणेच लाखो शांत युक्रेनियन आणि निष्पाप प्राण्यांचे जीवन धोक्यात आहे. भारत माते, गप्प बसू नकोस! रस्त्यावर जा आणि युक्रेनियन राष्ट्राला पाठिंबा दे. आमच्या भूमीवरील हे रक्तरंजित युद्ध थांबवण्यासाठी आम्हाला खरोखर तुमच्या मदतीची गरज आहे.” युक्रेनमध्ये पोहोचलेल्या या भारतीय कुत्र्याची कहाणी खूपच रंजक आहे.
Most Beautiful Building : दुबईतील ‘ही’ बिल्डिंग ठरली ‘जगातील सर्वांत सुंदर इमारत’
२०१७ साली एक युक्रेनी जोडपे युजीन पेट्रास आणि क्रिस्टिना मास्लोवा केरळ राज्यातील कोची या शहरात फिरायला आले होते. तिथे त्यांनी एका भुकेल्या कुत्र्याला पाहिले. यानंतर या जोडप्याने त्या कुत्र्याला मरणापासून वाचवले आणि आपल्यासोबत युक्रेनला घेऊन गेले. त्यांनी या कुत्र्याचे नाव चपाती असे ठेवले. त्यानंतर हे जोडपे जिथे कुठेही जात असत, ते या कुत्र्याला सोबत घेऊन जायचे. जेव्हा हे जोडपे युक्रेनची राजधानी कीवमध्ये राहण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी या कुत्र्यालाही सोबत घेतले. आता संकटाच्या काळात या दाम्पत्याने चपाती नावाच्या कुत्र्यासाठी भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे.
कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ‘हा’ लहानगा करतोय ठेल्यावर काम; नेटकऱ्यांनी केलं मेहनतीचं केलं कौतुक
चपाती नावाचा हा कुत्रा सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. या कुत्र्याचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ट्रॅव्हलिंग चपाती म्हणून एक अकाउंट आहे. हे युक्रेनी जोडपे हे अकाउंट चालवते. ते नेहमीच या कुत्र्याचे फोटो आणि व्हिडीओ अकाउंटवर पोस्ट करतात. त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये, जोडप्याने युक्रेनच्या भूमीवरील युद्ध थांबवण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे.