एका धक्कादायक घटनेत, केरळमधील डॉक्टरांनी श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णाच्या फुफ्फुसातून ४-सेमी लांबीचे झुरळ बाहेर काढले. Asianet Newsable च्या रिपोर्टनुसार, २२ फेब्रुवारी रोजी कोचीच्या अमृता हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रक्रिया पार पडली.
५५ वर्षीय व्यक्तीला श्वास घेताना खूप त्रास होत होता, त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. डॉ. टिंकू जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजी टीमने रुग्णावर प्रक्रिया केली. अहवालात असेही म्हटले आहे की, “झुरळच्या शरीराचे ‘विघटन’ होऊ लागले ज्यामुळे रुग्णाच्या श्वसन आरोग्यावर परिणाम होऊ लागला.
झुरळ काढण्यासाठी डॉक्टरांना आठ तास लागतात
रुग्णाच्या फुफ्फुसातून झुरळ यशस्वीरित्या काढण्यासाठी डॉक्टरांच्या टीमला आठ तास लागले आणि रुग्णाच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या श्वसनाच्या आरोग्याच्या समस्येमुळे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली. रुग्णाच्या फुफ्फुसात झुरळ कसे गेले हे उघड करताना, द पीपल्स नेटवर्कच्या अहवालात असे म्हटले आहे की, “रुग्णाच्या मागील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णाच्या मानेमधून श्वासोच्छवासाच्या नळीमध्ये झुरळ प्रवेश केला होता. डॉ जोसेफ यांनी सांगितले की,”रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.”
हेही वाचा – Numerology: मरेपर्यंत आपला शब्द पाळतात ‘या’ जन्मतिथीचे लोक! नेहमी दुसऱ्यांना मदत करतात
अशाच एका घटनेत, दिल्लीच्या डॉक्टरांनी २६ वर्षांच्या एका व्यक्तीच्या आतड्यातून ३९ नाणी आणि ३७ चुंबक बाहेर काढले. त्याला जवळपास २० दिवसांपेक्षा जास्त काळ उलट्या आणि पोटदुखीची समस्या होत असतात. राष्ट्रीय राजधानीतील श्री गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अहवालानुसार, “शरीराच्या निर्मितीमध्ये मदत होईलहे गृहीत धरून त्या व्यक्तीने शरीरातील झिंक वाढवण्यासाठी नाणी आणि चुंबक गिळले.”
हेही वाचा – नासाने शेअर केला अंतराळातून काढलेला पृथ्वीचा आश्चर्यकारक फोटो, पाहा बर्फाने झाकलेला हिमालय अन्…
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तैवानमधील डॉक्टरांनी एका महिलेच्या किडनीतून ३०० हून अधिक खडे काढले होते. इंडिपेंडंटमधील एका अहवालात असे म्हटले आहे की, ही महिला शरीरातील पाण्याची पातळी ठेवण्यासाठी फक्त गोड पेये घेत होती, पाणी नाही.”