आपल्यातील अनेकांना गाणी ऐकायला किंवा गुणगुणायला फार आवडतात. रेडिओ, युट्यूब, टीव्हीवर आपण आवडीची गाणी वेळ मिळेल तसं ऐकतो. काही जणांना साफसफाई करताना, जेवण बनवताना किंवा अभ्यास आणि ऑफिसचे काम करतानादेखील गाणं ऐकण्याची फार आवड असते. तर आज एका मुलीला तिच्या गाणं गाण्याच्या कौशल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळवून दिला आहे.
गाणी म्हटलं की सहसा आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी किंवा कन्नड गाणी ऐकतो किंवा बघतो; तर आज सोशल मीडियावर एका तरुणीने १४० भाषांमध्ये गाणं गाऊन विश्व विक्रम केला आहे. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुबईत, संयुक्त अरब येथे क्लायमेट कॉन्सर्ट होता. इथे एका केरळमधील तरुणीने १४० भाषांमध्ये गायन करून तिचे अनोखे कौशल्य दाखवले आहे. सुचेता सतीश असे या तरुणीने नाव असून तिने ९ तासांमध्ये १४० भाषांमध्ये गाणं गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरल आहे आणि तिच्या आवाजाने दुबईतील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
हेही वाचा…३ तास बर्फाच्या बॉक्समध्ये उभं राहून केला विश्वविक्रम; व्यक्तीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद…
पोस्ट नक्की बघा :
तसेच इन्स्टाग्रामवर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांचे प्रमाणपत्र घेताना तरुणीने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे आणि लिहिलं की, ही बातमी शेअर करताना मला आनंद होत आहे की, देवाच्या कृपेने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी क्लायमेटच्या कॉन्सर्टमध्ये नऊ तासांत १४० भाषांमध्ये गाऊन नवा विश्वविक्रम केला आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार, अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट सुचेता सतीशच्या या @suchethasatish इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या पेजवर दिलेल्या माहितीनुसार सुचेता सतीश यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी १४० भाषांमध्ये परफॉर्म करून विश्व विक्रम केला. दुबईतील COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या १४० देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गाणं गाण्यासाठी १४० भाषांची निवड करण्यात आली होती.