भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात धर्माच्या नावाखाली काहींनी कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी, देशवासियांमधील एकता कायमच अबाधित राहिली आहे. ही एकता टिकवण्यासाठी अनेक लोक, समाज धडपताहेत. कोणताही धर्म किंवा जात भारतीयांना एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही. अशी हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यामुळे समस्त भारतीयांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. एकीकडे गोमांस बंदीविरोधात केरळमध्ये आयोजित केलेली ‘बीफ पार्टी’ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती, तर दुसरीकडे याच केरळमध्ये हिंदू मंदिरात मुस्लिम बांधवासाठी आयोजित केलेली ‘इफ्तार पार्टी’ चर्चेचा विषय बनली आहे.
केरळमधील श्री नरसिंहमूर्ती मंदिरात रमजानचा उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो मुस्लिम बांधव या पार्टीला आले होते. त्यांनी अन्न ग्रहण करून रमजानचा उपवास सोडला. सुमारे ४०० हून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित होते. गेल्याच महिन्यात मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. त्यावेळी या परिसरातील मुस्लिम बांधवांनीही या कार्यात हातभार लावला होता. कार्यक्रमासाठी वर्गणीही गोळा केली. काहींनी मंदिराच्या बांधकामावेळी स्वत: पुढाकार घेऊन श्रमदान केले होते.
Viral Video : मुलाला कुत्र्याच्या तावडीत सोडून मुलीने काढला पळ