गेल्या आठवड्यातच आयफोन १४ ची सीरिज लॉंच झाली. आयफोनच्या सीरिजची तरुणाईमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते आहे. क्युपर्टिनो-आधारित कंपनीने डिझाईन केलेली उत्पादने त्यांच्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांसाठी आणि अर्थातच उत्तम लुकसाठी ओळखली जातात. अ‍ॅपलचा फोन असणे ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. यासाठी लोक काहीही करू शकतात. अशीच करामत एका पठ्ठ्याने केली आहे. याने आयफोन १४ विकत घेण्यासाठी असं काही केलं आहे, जे वाचून तुम्हालाही नवल वाटेल. या तरुणाने नेमकं काय केलं, ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोची येथील एका व्यावसायिकाने आयफोनच्या नवीन मॉडेलच्या पहिल्या मालकांपैकी एक बनण्यासाठी चक्क दुबई गाठली. धीरज पल्लीयल असे या तरुणाचे नाव असून तो गुरुवारी दुबईला गेला. मात्र अ‍ॅपलचे नवे मॉडेल विकत घेण्यासाठी त्याला खूप वाट पाहावी लागली. त्याला भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागले. अखेरीस सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दुबईतील मिर्डिफ सिटी सेंटरमधील प्रीमियम रिसेलरकडून त्यांच्या आयफोन १४ प्रो विकत घेता आला. यानंतर नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी अ‍ॅपल स्टोअरच्या बाहेर आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेकडो लोकांमध्ये धीरज ही पहिली व्यक्ती ठरली.

iPhone 14 घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फीचर्स, भारतातील किंमत आणि बरंच काही…

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रीच्या पहिल्याच दिवशी दुबईला जाऊन आयफोनची नवीन आवृत्ती विकत घेण्याची धीरजची ही सलग चौथी वेळ आहे. नव्या आयफोन सीरिजचा पहिला खरेदीदार बनण्यासाठी त्याने तिकिटांसाठी तब्बल ४० हजार रुपये आणि आयफोन १४ प्रोच्या जांभळ्या रंगाच्या ५१२ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी एक लाख २९ हजार रुपये खर्च केले.

२०१७ साली आयफोन ८ लॉंच झाला तेव्हा तो फोन खरेदी करण्यासाठी त्याने पहिल्यांदाच दुबई गाठली. त्यानंतर २०१९ साली जेव्हा आयफोन ११ प्रो मॅक्ससाठी सेल सुरु झाला तेव्हाही त्याने मिर्डिफ सिटी सेंटरमधील त्याच प्रीमियम रिसेलरकडून सर्वात आधी हा फोन विकत घेतला. विशेष म्हणजे भारतात हा मॉडेल लॉंच होण्याच्या काही आठवडे आधीच त्याच्याकडे हा फोन होता. तसेच जेव्हा दुबईमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १३ चा सेल सुरु झाला होता तेव्हाही हे मॉडेल्स विकत घेणारा तो पहिला खरेदीदार ठरला होता.