‘बाहुबली’ सिनेमामध्ये अभिनेता प्रभासने ज्याप्रकारे हत्तीच्या सोंडेवरून त्याच्या पाठीवर बसण्याचा पराक्रम केला तो पाहून अनेकजण थक्क झाले. मात्र ते दृष्य म्हणजे एडिटींगचा खेळ होता हे काहींना आजही समजत नाही. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. केळी खायला देण्याचे आमिष दाखवून हात्तीच्या सोंडेचे चुंबन घेतल्यानंतर सोंडेवरून पाठीवर चढण्याचा प्रयत्न करणे या व्यक्तीला खूपच महागात पडल्याचे या व्हिडीओत दिसते.

केरळमध्ये घडलेला हा प्रकार त्या व्यक्तीच्या मित्रांनी चित्रीत केला आहे. व्हिडीओत दिसते त्याप्रमाणे या व्यक्तीने केळी खायला देण्याचे आमिष दाखवून त्या हत्तीच्या जवळ गेला. ही व्यक्ती केळी खायला देत असल्याने हत्तीनेही या व्यक्तीला जवळ येऊ दिले. केळी दिल्यामुळेच हत्तीने त्याला सोंडेंचे चुंबनही घेऊ दिले. मात्र हत्तीशी जवळीक निर्माण झाल्याने हत्ती आपल्याला काहीही इजा करणार नाही असा त्याचा समज झाला. याच फाजील आत्मविश्वासामुळे त्याने हत्तीची सोंड खेचून त्यावर चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा हत्ती चवताळला. ‘नको असे करु नकोस. तू दारू प्यायलेला आहेस. हत्ती चवताळेल’ अशा खबरदारीच्या सूचना त्याचे मित्र त्याला देत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन त्याने सोंड खेचताच अपेक्षेप्रमाणे हत्ती चवताळला आणि त्याने या व्यक्तीला सोंडेने उडवून लावले. हत्तीच्या जोरदार धक्याने तो काही फुटांपर्यंत उडाला. या व्यक्तीची शुद्ध हरपल्याचेही व्हिडीओतून दिसून येते असून, सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Story img Loader