Viral video: प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामे, भांडणं पाहिले असतील.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनेने चक्क सासूला बेदम मारलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मारहाण करणारी महिला ही त्या वृद्ध महिलेची सून आहे. घरगुती वादातून भांडण होणं ही सामान्य बाब आहे; पण अशा प्रकारे मारहाण करणे हे आक्षेपार्ह आहे.
केरळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एक सून तिच्या वृद्ध सासूला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. दक्षिण केरळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळमध्ये राहणाऱ्या लियामा थॉमस या ८० वर्षीय महिलेसोबत तिची ३७ वर्षीय सून मंजू थॉमस हिने गैरवर्तन केले. व्हायरल व्हिडिओमध्ये एलियाम्मा थॉमस एका खोलीत शिरताना दिसत आहे. जिथे त्यांची सून मंजू थॉमस आणि तिची दोन अल्पवयीन मुले बसलेली दिसतात. इलियाम्मा थॉमस खुर्चीवर बसताच सून मंजू थॉमस त्यांना ओरडते आणि बाहेर जाण्यास सांगते. महिला वृद्ध महिलेला तू इथून निघून जा, असं वारंवार आपल्या सासूला सांगत आहे. घरातून बाहेर जात नाही म्हणून ती सासूला वारंवार मारत आहे
समाजात वडीलधार्यांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ कोणीतरी बनवत आहे, मात्र कोणताही हस्तक्षेप करीत नाही.
थोड्या वेळाने सून चक्क सासूला जोरात ढकलताना दिसत आहे. त्यानंतर वृद्ध महिला जोरात जमिनीवर पडते. यानंतरही मंजू थॉमस तिच्या सासूवर ओरडताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक सुनेवर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: भयंकर! जमिनीवर पाडलं, लचके तोडले; ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची माहिती केरळ पोलिसांपर्यंत पोहोचताच केरळ पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी मंजू थॉमसला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच मंजू थॉमस ही तिच्या सासूचा अनेक दिवसांपासून छळ करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. आरोपी मंजू थॉमस ही सरकारी शिक्षिका आहे.