उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर भागातील एका शाळेत हिजाब घालून ओणमचा सण साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विटरवर लाईक केला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये वंदूर सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील काही हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनी त्यांच्या शाळेतील इतर विद्यार्थिनींसोबत ओणम उत्सवाच्या संगीतावर नाचत आहेत. सोशल मीडियावर हजारो लोक त्यांचं कौतुक करत आहेत. काहींनी त्याची तुलना शेजारच्या कर्नाटकातील हिजाब वादाशीही केली आहे.
कॉ. महाबली नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “वंदूर उच्च माध्यमिक विद्यालय, मलप्पुरम इथला ओणम उत्सव. ओणम हा हिंदू सण आहे असे म्हणणाऱ्यांना समर्पित आणि हिजाब परिधान करणाऱ्या मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या आमच्या शेजारच्या राज्याला समर्पित.”असं या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
आणखी वाचा : Kala Chashma गाणं परदेशातही हिट, आफ्रिकन भावंड किली आणि नीमाचा नवा VIDEO VIRAL
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. तसंच लाईक करत या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावन शेअर करत आहेत. हे ट्विट लाईक करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचाही समावेश होता. त्यांचे पक्षाचे सहकारी आणि वंदूर एपीचे आमदार अनिल कुमार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : मुंबई पोलीस अधिकारी आणि चिमुकलीचा हा क्यूट VIRAL VIDEO एकदा पाहाच!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : Teachers Day 2022: मानवी तस्करीतून ४०० हून अधिक मुलांना वाचवणाऱ्या या शिक्षकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठात शांतता आणि संघर्ष संशोधनाचे प्राध्यापक असल्याचा दावा करणाऱ्या अशोक स्वेन नावाच्या यूजरने ट्विट केले की, “केरळमधील एका शाळेत हिजाब घातलेल्या मुस्लिम मुली ओणम साजरा करत आहेत. केरळच्या लोकांचा सुगीचा सण आहे. हिंदू अधिकाराने दावा केल्याप्रमाणे हा केवळ हिंदूंचा सण नाही.” या पोस्टला हजारो लोकांनी लाईक देखील केले आहे.
करोनाच्या साथीच्या आजारामुळे गेल्या दोन वर्षांपासून उत्सवावर बंदी घातल्यानंतर यंदा राज्यात ओणम उत्साहात साजरा केला जात आहे.