आई आणि मुलांचे नातं अत्यंत पवित्र असते. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिच्यासाठी तिची मुलं सर्वकाही असतात. आजच्या काळात नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आपल्या चिमुकल्या लेकरांना घरी ठेवावे लागते. कोणत्याही आईसाठी ही गोष्ट सोपी नसते. अशा स्थितीमध्ये आईच्या मनाची स्थिती काय असते याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी आपल्या मुलांपासून दूर परदेशी जात आहे. एअरपोर्टवरील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातही अश्रू येतील.
परदेशात कामासाठी निघालेल्या एका महिलेने आपल्या मुलांचा निरोप घेतानाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रिधिन देवासी कुट्टी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये त्यांची पत्नी नीना रिधिन आणि त्यांची जुळी मुले रायन आणि रायन यांचा समावेश होता. केरळमधील हा व्हिडीओ असल्याचे समजते.
व्हायरल क्लिपमध्ये नीना यांचा विमानतळावर निरोप घेण्यासाठी कुटुंबीय आले होते. तिच्या लहान जुळ्या मुले तिच्या सामानाची ट्रॉली ढकलताना दिसत आहे. त्यांना पाहून नीनाही भारावून जातेय
हृदयद्रावक क्लिपमध्ये दिसते आहे की नीना काचेच्या दारातून तिच्या मुलांना निरोप घेत आहे. त्यावेळी मुलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते त्यांच्या वडिलांकडे जाऊ आईकडे जाण्याची विनंती करताना दिसत आहे.
नीनाच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अश्रू अनावर झाले. “मी माझ्या आईला विमानतळावर निरोप देण्यासाठी गेलो होतो,” असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.