अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी तस्कर एक एक भन्नाट जागा शोधत असतात. कोणी बॅग, अंर्तवस्त्रे अगदी शरीराच्या काही भागात देखील करोडो रुपयांचे अंमली पदार्थ लपवले गेल्याच्या घटना आहेत आणि पोलिसांनी अशाप्रकारे तस्करी करणा-याला आधीच बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणापासून सावध होऊन केरळाच्या तीन मुलांनी गांजा लपवण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी हा गांजा चक्क आपल्या मोबाईल फोनमध्ये लपवला. मोबाईलच्या बॅटरीमागे गांजा लपवणारे हे तिघेही विद्यार्थी असून त्यातले दोन अल्पवयीन आहे. केरळ पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे. तपासणी करत असताना ही मुले घाबरलेली दिसत होती त्यामुळे पोलिसांना शंका आली. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात बाजूला घेतले असता आपण अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची कबुली या मुलांनी दिली. तसेच गांजाची तस्करी करणा-या मुख्य आरोपींची देखील माहिती त्यांनी दिली.
या मुलांच्या तस्करीबद्दल पोलिसांना समजलेही नसते. चौकशीसाठी या मुलांचे फोन पोलिसांना ताब्यात घेतले. पण तिघांपैकी एकाचाही फोन सुरु नव्हता. त्यामुळे पोलिसांनी फोनची बॅटरी काढून पाहिली तर त्यात गांजाची पूडी पोलिसांना सापडली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे तिन्ही आयटीआयचे विद्यार्थी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala students found a new way to hide ganja