संपूर्ण घराचा डोलारा एकटी स्त्री सांभाळते. घरातील प्रत्येक सदस्याची काम करता करता गृहिणीची दमछाक होते, तिला दिवसभरात जराही उसंत मिळत नाही. आपल्या आईची ही समस्या ओळखून केरळमधल्या एका मुलाने यावर भन्नाट तोडगा शोधून काढला. केरळमधील मोहम्मद सय्यद चतोथ या १७ वर्षांच्या मुलाने आईला घरकामात मदत करण्यासाठी चक्क एक रोबोट बनवला आहे. इतक्या लहान वयातील ही कल्पना आणि ते सत्यात उतरवण्याचे प्रयत्न अचंबित करणारे आहेत. पण नेटकऱ्यांना मात्र ही संकल्पना फारशी पटली नाही आणि हा रोबोट सध्या ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे यामागच कारण जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरकामात मदत करण्यासाठी बनवण्यात आलेल्या या रोबोटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे मत मांडले आहे. नेटकऱ्यांनी ‘रोबोट बनवण्याएवजी तू स्वतः आईला मदत करू शकतोस’, ‘मॉडर्न पुरुष घरातील स्त्रीला मदत करण्याऐवजी असे काही तरी करतील’, ‘तंत्रज्ञान पुरुषसत्ताक विचारसरणी बदलू शकत नाही’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पाहा व्हायरल होणारा रोबोटचा फोटो आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

Viral : जागतिक अन्नदिनादिवशी गरीब मुलीची बर्गर खाण्याची इच्छा या व्यक्तीने केली पूर्ण! नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

व्हायरल फोटो :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : शेतातील टोमॅटो गाडीत भरण्याची ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले ‘ऑलिम्पिक स्पर्धेत..’

आईला स्वतः घरकामात मदत करण्याऐवजी रोबोट तयार करण्याची आणि त्यातही पुरुषसत्ताक विचारसरणीनुसार बनवण्यात आलेल्या या रोबोटची संकल्पना अनेकांना पटली नाही.