गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूस्खलनामध्ये हरवलेले लोक आणि मृतदेह सापडल्याच्या भयावह बातम्यांच्यामध्ये आता एक हटके बातमी समोर आली आहे. एका जोडप्याने ज्यांचे नाव आकाश आणि ऐश्वर्या आहे या दोन्ही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हटके पद्धतीने लग्न केलं आहे. दोघेही केरळचे रहिवासी आहेत, परंतु झालेल्या भयंकर पावसामुळे आलेल्या पूराने बरेच काही उद्ध्वस्त केले, तरीही या जोडप्याने हार मानली नाही आणि लग्न करण्यासाठी मोठ्या अॅल्युमिनियमच्या स्वयंपाकाच्या भांड्यात बसून लग्नासाठी हॉलवर पोहचले. केले.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आणि ऐश्वर्याने जवळच्या एका मंदिरात त्यांच्या लग्नाचे विधी पूर्ण केले. असे समजले आहे की ते या महिन्याच्या सुरुवातीला लग्न करणार होते परंतु काही कारणामुळे लग्न झाले नाही. त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले,त्यानंतर आता त्यांनी नातेवाईकांच्या मान्यतेने लग्न केले. परंतु लोकांना एका गोष्टीचे आश्चर्य वाटले ते वधूच्या लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेल्या गोष्टीमुळे. वर वधूने स्वयंपाकाच्या भांडीमधून हॉलमध्ये एन्ट्री केली. त्यांनी ज्या प्रकारे प्रवास केला ते बघून नेटीझन्सला धक्का बसला आहे.

( हे ही वाचा: Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी)

( हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना )

लग्नाचे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर, वधूने मीडियाला सांगितले की तिने कोविडमुळे कमीतकमी लोकांना आमंत्रित केले आहे, तिने असेही सांगितले की सोमवारी लग्नाचे नियोजन केले असल्याने तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हे एक शुभ कार्यक्रम होते आणि त्याला आणखी विलंब करायचा नव्हता. वधू पुढे म्हणाली की जेव्हा ती काही दिवसांपूर्वी मंदिरात पोहोचली तेव्हा तेथे पाणी नव्हते, परंतु गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानंतर ते पाण्याने भरले होते. वधू आणि वर हे चेंगन्नूर येथील रुग्णालयात काम करणारे आरोग्यसेवक आहेत.

Story img Loader