Kerala Wayanad Landslides Video: केरळच्या वायनाडमधील काही गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला ज्या दिवशी दहा वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी तश्शीच मोठी दुर्घटना केरळमधीलवायनाड येथे घडली. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक सातत्याने बचावकार्य करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सध्या समोर आले आहेत, हे व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या या भीषण विध्वंसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसेच मदतकार्य कसे सुरू आहे याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

Punekar man wrote funny message in back of the car Photo goes viral on social media puneri pati
याला म्हणतात पुणेकरांचा धाक; पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
Maharashtra Kolhapur Mother Saves Son's Life, Attacked With Sword shocking CCTV
VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड

पाहा व्हिडीओ

केरळमधील वायनाडमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसाचे दृश्य या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहता येते. @Gokerala_ नावाच्या अकाऊंटने एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही NDRF च्या इतर टीम आणि मदत बचाव पथक लोकांना मदत करताना पाहू शकता. यावेळी आजूबाजूला अनेक झाडे तोडलेली दिसतात. तसेच दूर वाहत्या पाण्यात एक कार अडकलेली दिसते. तुटलेल्या घरांचे ढिगारे जवळच पुरात पडलेले दिसतात. व्हिडिओमध्ये वायनाडमधील परिस्थिती पाहून भुस्खलन किती गंभीर होता याचा अंदाज लावता येतो.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ भारतीय तटरक्षक दलाने त्यांच्या अधिकृत एक्स पेज @IndiaCoastGuard वरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वायनाडमध्ये झालेल्या विध्वंसानंतर तटरक्षक दल दोरीचा सर्व मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहे. पुरामुळे जमिनीवर दुसरे मशिन चालवणे सोपे नाही, त्यामुळे बचाव पथकाला सर्व काम स्वतः करावे लागते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ @AbGeorge_ नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हे शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, ‘काही शेजारी घरापासून ५० मीटर अंतरावर बेपत्ता आहेत.. ही दृश्ये आहेत विलनगड (कोझीकोड जिल्हा, केरळ) येथील. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. संपूर्ण परिसर वेगळा झाला आहे.

हेही वाचा >> VIDEO: भावकीचा वाद टोकाला गेला; बांधावरच ट्रॅक्टर एकमेकांच्या अंगावर चढवला, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

पाहा व्हिडीओ

एक्सवर @pavioffcl अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये केरळमधील वायनाडमधील विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. तुम्हाला एरियल व्ह्यू मधून बघायला मिळत आहे. झाडं कशी तुटून विखुरली आहेत. तर काही वाहने मधोमध झाडांमध्ये अडकलेली दिसतात. आजूबाजूला पाण्याचा महापूर दिसतो.

बचावकार्य सुरू

वायनाडमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. यापूर्वी एनडीआरएफ कमांडर अखिलेश कुमार यांनी म्हटलं होतं की, आता आम्ही बचाव कार्य सुरू करत आहोत. आमची टीम इथल्या अनेक गावात जाणार आहे. अनेक घरांमध्ये लोक अडकले असण्याची शक्यता आहे. काल रात्री आम्ही सुमारे ७० लोकांना वाचवलं. खराब हवामानामुळे रात्री बचावकार्य थांबवावं लागलं. येथे आणखी जोरदार पाऊस झाल्यास धोका वाढू शकतो.

केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मोठा विध्वंस झाला. अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे २२,००० लोकसंख्या असलेली चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या विनाशकारी वादळात आतापर्यंत १५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्य कठीण होत आहे.