लोकप्रिय मल्याळम चित्रपटाने प्रेरित केलेल्या धाडसी स्टंटमुळे केरळमधील एक YouTuber चर्चेत आला आहे. संजू टेकी या युट्युबरने ‘आवेशम’ चित्रपटातील एका दृश्याची नक्कल करण्याच्या प्रयत्नात एका चालत्या कारला ताडपत्री लावून आणि त्यात पाणी भरून एका तात्पुरत्या स्विमिंग पूलमध्ये रुपांतरीत केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये, संजू आणि त्याचे मित्र कारच्या आत त्यांच्या तात्पुरत्या तलावात पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत, एका रहदारीच्या रस्त्यावरून जाताना नारळाच्या पाण्याचा आनंदघेत आहेत. त्यांच्या कृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले पण त्याचबरोबर पोलिस अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले. कारचे जलतरण तलावाच्या रूपातंरण करणे हे दृश्य अनेकांसाठी मनोरंजक असले तरी प्रत्यक्षात कोणी असेल करत असेल तर चिंताजनक असू शकते.

ड्रायव्हरच्या सीट आणि इंजिनमध्ये पाणी शिरल्याने खरी समस्या सुरू झाली. घाबरलेल्या संजूने गाडी चालवणाऱ्या त्याच्या मित्राला दार उघडून पाणी काढून टाकण्याची सूचना केली. त्यांनी गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून पाणी सोडले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ही उत्स्फूर्त पूल पार्टीने गोंधळाचे वातावरण निर्माण केले. रस्त्यावर पाणी तुंबले आणि लक्षणीय व्यत्यय निर्माण झाला.

या स्टंटचा व्हिडिओ त्वरीत व्हायरल झाला, ज्यामुळे लोक आणि अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मोटार वाहन विभागाने (MVD) दखल घेत संजू टेकीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्याच्यावर बेपर्वा वाहन चालवण्यापासून सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यापर्यंतच्या सहा गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता आणि त्याला बुधवारी अंमलबजावणी रस्ते वाहतूक अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागले.

एमव्हीडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, “त्यांनी धोकादायक पद्धतीने वाहनातील पाणी रस्त्यावर सोडले, ज्यामुळे रस्त्यावरील इतर वाहन वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला.” या स्टंटमुळे केवळ संबंधितांनाच नाही तर इतरांनाही धोका निर्माण झाला. ज्या वाहनचालकांना वर्दळीच्या रस्त्यावर अनपेक्षित पुरामुळे मार्गक्रमण करावे लागले.

परिणामी, संजू आणि कारमधील इतर तिघांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आठवडाभर सामुदायिक सेवा करण्याचे आणि विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. ही शिक्षा त्यांना नागरी जबाबदारी आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व शिकवण्यासाठी होती. याव्यतिरिक्त, कार चालवणाऱ्या व्यक्तीचा ड्रायव्हरचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केला जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala youtuber sanju techy booked for setting up swimming pool inside car watch video here snk