मराठा आरक्षणाचा विषय पेटतच चालला आहे, सरकार तारखांवर तारखा देत आहे. तर मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाच्या या लढाईत अनेकजण जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहेत. कलाकारांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातच केतकी चितळे हिनं मराठा आंदोलनावर एक पोस्ट केली होती. यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टिकांचा भडीमार झाला. दरम्यान यावेळी मात्र केतकी चितळेच्या फेसबूक पोस्टपेक्षा कमेंटचीच जास्त चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. केतकीच्या पोस्टवरील एकापेक्षा एक कमेंट वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकी चितळे नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राज्यात एखादा पेटता विषय असेल, समस्या असेल तेव्हा केतकी हमखास त्यावर भाष्य करते. त्यावेळी खूप कमी लोकांचं तिला समर्थन मिळतं, तर मोठ्याप्रमाणात तिच्यावर टीका केली जाते. आताही राज्यात सध्या सुरु असणारा गंभीर विषय म्हणजेच मराठा आरक्षण, यावर तिने एक फेसबूक पोस्ट करत भाष्य केलं आहे.

पाहा केतकीची पोस्ट

हेही वाचा >> मागवला होता मिल्कशेक; पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयनं सांगितलेलं कारण ऐकून व्हाल थक्क

“ताई याआधी ५५ मोर्चे शांततेत काढले होते त्यावेळी झोपला होतात का?”

“एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर?” अशी पोस्ट तिनं केली होती. यावर नेटकरी तुटून पडले आहेत. अनेक नकारात्मक प्रतिक्रिया यावर नेटकरी देत आहेत. यावर एकानं कमेंट केली आहे की “ताई याआधी ५५ मोर्चे शांततेत काढले होते त्यावेळी झोपला होतात का?”, तर आणखी एकानं म्हंटलंय की “जेव्हा ८०% मिळून तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही, ४०% वाल्या मुलाला सहज मिळते, तेव्हा आरक्षण किती महत्वाचं हे कळतं.” अशा अनेक कमेंट केतकीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. बरं या कमेंट्स वाचून शांत बसेल ती केतकी कसली, केतकीनंही नेटकऱ्यांच्या कमेंटला उत्तरं दिली आहेत.

हेही वाचा >> बापरे! चाकं नसलेल्या बाईकची रस्त्यावर सुसाट एन्ट्री; Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

“सध्या राज्यात वातावरण खूप खराब आहे त्यामुळे अशा पोस्ट करु नका” असा सल्लाही एकानं दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale on maratha aarakshan facebook post comments goes viral on the internet people reacting on it ketaki chitale troll srk
Show comments