Funny video: भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच एक असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. त्याशिवाय स्त्रिया कुठे आणि कशावरून भांडतील हे सांगता येत नाही, असंही नेटकरी म्हणत आहेत. त्याचं कारण म्हणजे सध्या पैठणी जिंकण्यासाठी दोन वहिनी एकमेकींना भिडलेल्या दिसत आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. खरं तर महिलांमध्ये साड्यांची खूप क्रेझ असते. त्यांना सतत नवीन साड्या खरदी करण्याची आवड असते.

पैठणीच्या खेळात वहिनी भिडल्या

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीक पॉईंट. साडी खरेदीच काय; पण त्याच्या विंडो शॉपिंगमध्येही महिलांचा तास-तासभर वेळ जातो. आवडीचा रंग, डिझाईन आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज मिळाल्या की, कळी खुललीच म्हणून समजा. मात्र, याच साडीसाठी स्पर्धा लागली, तर ती जिंकण्यासाठी महिला काय करतील याचा नेम नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही वहिनी एकमेकींना हरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पैठणीच्या या खेळात दोघींच्या हातात एक-एक फुगा दिला आहे. जिचा फुगा शेवटपर्यंत न फुटता राहणार, तिला पैठणी मिळणार, असा हा खेळ आहे. त्यामुळे दोघीही एकमेकींना हरविण्याचा प्रयत्न करतात. आपला फुगा वाचविण्यासाठी आणि समोरच्या महिलेचा फुगा फोडण्यासाठी दोघींमध्ये चांगलीच कुस्त्ती रंगते. यावेळी साडीचा विषय आहे म्हटल्यावर दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. शेवटी दोघीही खाली पडतात आणि मग एक वहिनी दुसऱ्या वहिनीचा फुगा फोडण्यात यशस्वी होते. त्या एवढ्यावरच थांबत नाहीत, तर जिंकल्यानंतर त्या स्टेजवरच नाचू लागतात. अक्षरश: कुस्ती रंगल्यासारखा हा खेळ झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तो निवांत बसला होता पण एका कृतीनं होत्याचं नव्हतं झालं; बसमध्ये तुम्हीही ‘असे’ करता का? थरारक VIDEO पाहाच

@krantimalegaokar’s नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे, “ओ स्त्री है साडी के लिये कुछ भी कर सकती है.” तर आणखी एकाने, या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा महिलांचं साडीवरील प्रेम दिसून आल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader