Viral video: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाचं डोकं कारच्या खिडकीमध्ये अडकलं होतं. काही केल्या खिडकीची काच खाली येईना. आणि शेवटी या मुलासोबत काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता कार ऑटोमॅटीक असल्यामुळे ती थांबताच खिडकीची काच हळूहळू वर आली. परिणामी त्या मुलाचं डोकं खिडकीमध्येच अडकलं. बरं, तेवढ्यात कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले त्यामुळे काही केल्या ती काच खाली येत नाहीये. तर दुसरीकडे या मुलाचा श्वास गुदमरू लागला.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने प्रसांगवधान दाखवून लगेच मदतीसाठी धावले.स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीनं क्षणात खिडकीची काच फोडली. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> प्रेमात धोका! बॉयफ्रेंड दुसऱ्या पोरीसोबत दिसला अन् पुढे नको ते घडलं; अरुणाचल प्रदेशातला VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. पालकांचं थोडसं दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकतं. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.