जगातल्या प्रत्येक आई वडिलांचं प्रेम हे अमूल्य असतं. मग ते जनावरांचं असो किंवा मग मनुष्याचं. आपण बाहेरून घरात आलो की पहिल्यांदा आपली नजर आईला शोधते. जर त्यावेळेस आईला घरात कुठे सापडली नाही तर जीव अगदी कावराबावरा होतो. प्राण्यांचंही अगदी तसंच आहे. सध्या या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आईपासून हरवलेलं कोकरू दिसतंय. एका छोट्याश्या चिमुकल्याने या कोकरूला मदत करत त्याच्या आईला शोधून काढलंय. आई आणि पिल्लाच्या भेटीचा हा क्षण पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शिनजियांगच्या वायव्य चिनी प्रदेशातील तचेंग इथला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये दोन वर्षचा लहान मुलगा छोट्याश्या कोकरूच्या बाजूला चालत असल्याचं दिसत आहे. चालता चालता हा चिमुकला कुठेतरी हाताने इशारा करत असल्याचे दिसून येत आहे. हा चिमुकला ज्या दिशेने बोट दाखवेल त्या दिशेने हे कोकरू पुढे पुढे जाताना दिसत आहे. हा चिमुकला ज्या दिशेने इशारा करतोय त्या दिशेने हे कोकरू आपल्या आईला शोधताना दिसतंय. काही पावलं आणखी पुढे गेल्यानंतर आपल्या कोकरूचा आवाज ऐकल्यानंतर त्याची आई सुद्धा त्याला शोधत शोधत पुढे येते. ज्यावेळी कोकरूला त्याची आई भेटली त्यावेळी कोकरू तिच्या मिठीत जातं. कोकरू खूपच भुकेले असल्याचं दिसून येतंय. कदाचित तो दुध पिण्यासाठी आपल्या आईला शोधत असावं, असा अंदाज लावण्यात येतोय. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देखील शेअर करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : ब्लडप्रेशरच्या मशीनने शुगर तपासलं, ‘साथ निभाना साथिया’ मालिकेचा हा सीन होतोय VIRAL, मीम्सचा पाऊस

आणखी वाचा : इवल्याश्या कासवांनी या VIRAL VIDEO तून दिला आयुष्यातला सर्वात मोठा धडा

आई आणि कोकरूच्या या भेटीचा हा भावूक करणारा व्हिडीओ Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. आई आणि तिच्या कोकरूच्या भेटीला हा प्रसंग मनाला भिडणारा आहे. आईच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या या कोकरूच्या भावना दोन वर्षाच्या चिमुकल्याने उत्तम ओळखल्या आणि त्याने कोकरूला त्याच्या आईला शोधण्यात मदत सुद्धा केली, हे पाहणं फारच गोंडस आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ४३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader