Viral video of a kid: लहान मुलं घरात असली की त्यांची मजा-मस्ती सुरूच असते. कुठे बहीण-भावांची खोड काढ, कुठे आईला त्रास दे अशी मस्ती करायला मुलांना खूप आवडतं. पण, मस्तीची कुस्करी झाली तर ती जीवघेणीदेखील ठरू शकते. मस्तीच्या नादात अनेक लहान मुलांचे अपघात झाल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. सध्या अशाच एका लहान मुलाचा प्रताप त्याला भारी पडला असता, जर त्याच्या आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं नसतं. या लहान मुलाने असं काहीतरी केलं की त्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला बेडमध्ये असलेल्या स्टोरेजमधून अंथरूण, कपडे, साड्या बाहेर काढून साफसफाई करताना दिसत आहे. साफसफाई करताना तिचा मुलगा तिला त्रास देत आहे. कुठे कपडे उचल, त्यांच्याशी खेळ अशी मजामस्ती त्या मुलाची सुरू आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची आई त्याला दम देते आणि तिथून निघून जाण्यास सांगते.

हेही वाचा… माणूस नाही हैवान! श्वानाच्या शेपटीला बांधला फटाका अन्…, VIDEO चा शेवट पाहून व्हाल निशब्द

यादरम्यान एका बाजूला महिला आपलं काम करत असताना तो मुलगा हळूच येतो आणि बेडच्या स्टोरेजमध्ये अंगावर चादर घेऊन लपून बसतो. कामात व्यग्र असलेल्या आईला ते कळत नाही आणि ती तो बेड बंद करून घेते. बेड बंद करताच आतमध्ये बसलेला मुलगा बेडवरील फळी जोरजोरात आपटू लागतो. हे लक्षात येताच महिला धावत येते आणि बेडचा दरवाजा उघडते. आत लपलेल्या मुलाला बाहेर काढते आणि त्याला जवळ घेते.

हा व्हिडीओ @mrs.bundelkhand_sandhya_tiwari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना रेकॉर्ड, कृपया तुमच्या मुलांची विशेष काळजी घ्या” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तब्बल १७.१ मिलियन व्ह्यूज या व्हिडीओला आले आहेत.

हेही वाचा… तरुणीने भररस्त्यात सगळ्यांना ‘असं’ करायला सांगितलं की…, लोकांनी दिला बेदम चोप, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मला वाटलं, मुलाला बाहेर काढल्यावर आधी एक-दोन कानशि‍लात लगावेल.” तर दुसऱ्याने, “बेडरूममध्ये कोण सीसीटीव्ही कॅमेरा लावतं” असा प्रश्न विचारला. तर एक जण कमेंट करत म्हणाला, स्क्रिप्टेड आहे; बेडरूममध्ये कोण कॅमेरा ठेवतं”, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kid hides in a bed and got stuck mother helps him out viral video on social media dvr