ख्रिसमस म्हणजे नाताळ सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून अनेकजण त्यानिमित्ताने जय्यत तयारी करताना दिसत आहेत. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे ख्रिसमसच्या तयारीसाठी आता बाजारपेठा देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहेत. या सणासाठी लहान मुलं फार उत्सुक असतात. कारण ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉज लहान मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देताना दिसतो. विशेषत: लहान मुलांना सांताक्लॉजला भेटण्यातही एक वेगळा आनंद मिळत असतो. सध्या असाच चिमुकला मॉलमध्ये आईबरोबर फिरत असताना सांताक्लॉजला पाहून खूप आनंदी होतो. यानंतर आईचा हात सोडून धाव सुटतो आणि थेट जाऊन सांताक्लॉजला मिठी मारतो. ज्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुल त्याच्या आईच्या कुशीतून बसून मॉल फिरत असते, पण समोरून येणाऱ्या सांताक्लॉजला पाहताच तो त्याच्या आईच्या कुशीतून उडी मारून त्याच्याकडे धावत जातो. यावेळी एक वृद्ध व्यक्ती सांताक्लॉज बनून आलेला असतो. चिमुकला जवळ येताच सांताक्लॉज बनून आलेली व्यक्ती त्याला खांद्यावर उचलून घेते आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागते. मुलं त्याच्याकडून आईकडे जाण्यास तयार होत नाही, अशावेळी सांताक्लॉज त्याच्या कानात काहीतरी सांगतो जे ऐकत तो शेवटी खाली उतरतो. यानंतर अगदी आनंदाने चिमुकला आईकडे पळत जातो. https://www.instagram.com/reel/C0UVCj4ujK7/?utm_source=ig_embed&ig_rid=151e173b-5064-4c2a-91af-c95c6d3eb190 हा मजेशीर व्हिडीओ @goodnews_movement या Instagram अकाऊंटवर पोस्ट केले आहे. ज्यावर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, वर्षातील हा काळ वृद्धांसाठीही एकाकीपणाचा अनुभव देणारा असतो, कारण त्यांनाही यावेळी काम करावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर असेच प्रेम दाखवले तर त्यांचा दिवस चांगला होईल. तर हा व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू आले अशी कमेंटही एका युजरने केली आहे.