बहिण- भावाच्या नात्यातील प्रेम आपुलकी आपल्याला इतर कोणत्याही नात्यात पाहाला मिळत नाही. भाऊ- बहिण एकमेकांसोबत कितीही भांडले तरी अडीअडचणीच्यात तेच एकमेकांच्या मदतीसाठी येतात. यामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील माया काही केल्या कमी होत नाही. यात भावंडामध्ये जेव्हा वयाचा मोठा फरक असतो, तेव्हा घरातील मोठी भावंड लहान भावंडांची जबाबदारी घेतात. भाऊ- बहिणीचे प्रेम दाखवणारी हजारो उदाहरणे आहेत, रस्त्यावर आयुष्य जगणारी मुलं हे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेताना दिसतात. ते आपल्या लहान भाऊ – बहिणींची काळजी तर घेताना दिसतात पण त्यांना खाऊ घालण्यासाठी तितकीच मेहनतही घेतानाही दिसतात. अशाचप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी एक मोठा भाऊ धाकट्या भावाला पाठीवर घेत रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल चालवताना दिसत आहे, या दोन भावांचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

धाकट्या भावाच्या संगोपणासाठी रस्त्यावर चालवतोय रद्दीने भरलेली सायकल

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक १२ – १३ वर्षांचा मुलगा रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल ट्रॉली चालवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी जड सायकल चालवत असताना त्याने पाठीवर धाकट्या भावाला घेतले आहे. या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला अगदी घट्ट धरुन ठेवलेले दिसतेय. हा मुलगा मोठा भाऊ म्हणून आपल्या धाकड्या भावाच्या संगोपनाचे कर्तव्य, जबाबदारी पार पाडत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते

Thefeel_2 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आता नेटिझन्सची मनं जिंकत आहे, अनेकांनी कमेंटमध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट करत व्हिडीओवर पसंती दर्शवली आहे. तर काहींना व्हिडीओतील मुलाच्या परिस्थितीवर दु:ख व्यक्त केल आहे. तर काहींनी वयाची चिंता न करता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याबद्दल मुलाचे कौतुक केले आहे.

एका युजरने लिहिले की, जेव्हा दोन्ही भाऊ या दु:खातून आणि त्रासातून जातात, तेव्हा त्यांचे एकामेकांवरील प्रेम आणि आदर आणखी वाढतो. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, पुस्तकांनी भरलेली बॅग घेऊन जाण्याच्या वयात या निरागस मुलांचा जगाचा भार उचलावा लागतो. जगाच्या निर्मात्याने थोडीशी दयाही दाखवली नाही, निदान थोडी तरी दया दाखवा.

Story img Loader