Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे पण त्याचे कारण मात्र अत्यंत खास आहे. खरंतर हा व्हिडीओ लहान मुलांचा आहे ज्यामध्ये त्यांनी असे काही केले आहे जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे.
खरतरं लहान मुलांना अनेकदा पेन्सिल किंवा रंगांनी चित्र काढायला आवडते. कित्येकदा मुलं वही-पुस्तक सोडून घराच्या भिती रंगवतात. असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. इंस्टाग्रामवर natureferver नावाच्या अकाउंटवर चिमुकल्या मुलींचे दोन वेगवेगळे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
पहिल्या व्हिडीओमध्ये एका चिमुकलीने आईची लिपस्टिक घेऊ टॉयलेट रंगवले आहे. टॉयलेट सीट, जमीन आणि भिंतीसह स्वत:लाही लाल लिपस्टिकने रंगवले आहे. चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून लोकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. लोकांना चिमुकलीचा हा गोंडस व्हिडीओ फार आवडला आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये बेडवर झोपलेल्या वडीलांना दोन चिमुकल्यांनी रंगाचे खडू वापरून रंगवले आहे. वडिलांच्या नखांना, तोडांला, पोटावर संपूर्ण अंगावर वेगवेगळ्या रंगाच्या ख़डूने रंगवले आहे. वडीलांना रंगवताना दोघी चिमुकल्यांनी स्वत:च्या तोंडाला, कपड्यांना आणि हाता-पायानां देखील रंगवले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरेना झाले आहे. दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – लेकीसह वडिलांनी केला भन्नाट डान्स! मजेशीर व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “काका तुम्ही तर….
व्हिडीओमध्ये पाहून अनेकांना बालपण आठवत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक लोक व्हिडीओवर जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. या हा व्हिडीओ पाहून एकाने लिहिले की, “मला माझे बालपण आठवले” दुसऱ्याने लिहले, “मुलांचे बालपण खूप गोड असते” तर आणखी एक जण म्हणाला की, “प्रत्येकाने आपल्या लहानपणी असे काम नक्की केले असावे.”