Kidnapping Case Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे आढळले. त्यामध्ये दोन मुलींचे लिफ्टमधून घुसून दोन व्यक्तींनी अपहरण केल्याचे दिसत आहेत. ही घटना कर्नाटकातील बंगळुरूमध्ये घडल्याचा दावाही या व्हिडीओबरोबर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुली एका इमारतीतील लिफ्टमध्ये दिसत आहेत. जेव्हा लिफ्ट थांबते, तेव्हा दोन पुरुष आत येतात आणि रुमालाद्वारे मुलींची तोंडे दाबून ठेवतात. त्या दोघींनी केलेले प्रतिकाराचे प्रयत्न अयशस्वी ठरतात आणि त्या बेशुद्ध पडतात. त्यानंतर अपहरणकर्ते मुलींना उचलून लिफ्टबाहेर घेऊन जाताना दिसत आहेत. पण, खरेच हा व्हिडीओ बंगळुरूमधील आहे का याचा आम्ही तपास सुरू केला. तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले. ते नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर सौम्या रंजन नायकने सोशल मीडिया हॅण्डलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
An attempt by the accused in the Bopdev Ghat case to mislead the police Pune news
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://archive.ph/sZM3h

इतर वापरकर्ते देखील व्हिडिओसह हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमचा तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला alarabiya.net वर एक बातमी सापडली.

https://www.alarabiya.net/arab-and-world/egypt/2023/12/21/%D8%A3%D9%85-%D8%B7%D9%81%D9%84%D8%AA% D9%8A-%D9%81%D9%8A%D8%AF%D9%8A%D9%88-%D8%A7%D9%84%D8%AE%D8%B7%D9%81-%D8%AA %D9%83%D8%B4%D9%81-%D9%85%D8%A7-%D8%AD%D8%B5%D9%84-%D9%84%D8%A7-%D8%A3%D8 %B9%D8%B1%D9%81-%D8%B4%D9%8A%D8%A6%D8%A7%D9%8B-%D8%B9%D9%86-%D8%AD%D9%86% D9%8A%D9%86

बातमीमध्ये म्हटले होते की, गेल्या दोन दिवसांत संपूर्ण इजिप्तमध्ये दोन मुलींच्या अपहरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या आईने नवीन माहिती उघड केली. घराच्या लिफ्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या जना आणि हनिन यांच्या आईने म्हणजे हेबा हसन हिने पुष्टी केली की, त्यांना अपहरण झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्या कामावरून लवकर घरी परतत होत्या तेव्हा त्यांना रस्त्यावर एक मुलगी नशा करताना दिसली.

यावरून हा व्हिडिओ इजिप्तचा असल्याची पुष्टी झाली. ही बातमी २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित झाली होती.

आम्हाला lovincairo च्या Instagram हँडलवर एक पोस्ट सापडली.

पोस्टमध्ये म्हटले आहे : लिफ्टमध्ये दोन मुलींचे अपहरण झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृह मंत्रालयाने त्या दोन पुरुष अपहरणकर्त्यांना अटक करण्याची घोषणा केली आहे. या घटनेतील एका व्हिडीओत एक अपहरणकर्ता त्या मुलींच्या वडिलांबरोबर दिसला होता आणि दुसऱ्या घटनेत तीच व्यक्ती कारचालक होती. चौकशीदरम्यान आरोपींनी अपहरणाच्या घटनेत सहभागी असल्याचे कबूल केले, तसेच अपहरणाचा हा कट त्यांनी पैशांसाठी मुलींच्या वडिलांबरोबर मिळून रचल्याचेही सांगितले. पब्लिक प्रॉसिक्युशन आता या घटनेचा तपास करीत आहे.

आम्हाला या घटनेबाबत अनेक बातम्याही मिळाल्या.

https://egypt-now.net/news131274.html

निष्कर्ष: इमारतीच्या लिफ्टमधून दोन मुलींचे अपहरण झाल्याचा इजिप्तमधील जुना व्हिडिओ आता बंगळुरुमधील असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.