शहरांमध्ये नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या नवीन लोकांना राहण्यासाठी भाड्याने रुम शोधणे हे किती अवघड आणि कंटाळवाणे काम असते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी या परिस्थितीचा सामना केलेला आहे. शिवाय जरी रुम मिळाली तरी डिपॉजिट आणि रुमभाड्याची किंमत ऐकून भाडेकरूंच्या त्रासात आणखी भर पडते. त्यामुळे अनेकांना आपलं आर्थिक आणि मानसिक गणित जुळवताना नाकी नऊ येतात.

सध्या याच रुम भाड्याच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आपली डावी किडनी विकायला काढली आहे. हो शिवाय त्याने याबाबतचे पोस्टर्सजेखील बंगळुरुमधील एका रस्त्याकडेला लावलं आहे. सध्या या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. खरंतर या व्यक्तीने हे पोस्टर गमतीने चिकटवले आहे. @ramyakh वावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या पोस्टरचा फोटो शेअर करण्यात आला आहे. जे पोस्टर रस्त्याकडेला असणाऱ्या एका खांबावर चिटकवलं आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

हेही पाहा- सरकारी कार्यालयात हेल्मेट घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा Video Viral; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

हेही पाहा- रेल्वे प्रवासादरम्यान सिगारेट पित होती तरुणी; एका प्रवाशाने थेट रेल्वे मंत्र्यांना Video टॅग केला अन्…

या पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे की, ‘डावी किडनी विकायची आहे. घर मालकाकडून मागितल्या जाणाऱ्या सिक्योरिटी डिपॉजिटसाठी पैशांची गरज आहे.’ तसंच या व्यक्तीने त्याच पोस्टरमध्ये पुढे आपण हे गमतीने लिहित असून, मला इंदिरानगरमध्ये घर हवे आहे. प्रोफाइलसाठी कोड स्कॅन करा असंही लिहिलं आहे. मात्र, या व्यक्तीच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूल घातला आहे.

अनेकांनी हे ट्विट रिट्विटकरत त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.अनेक नेटकऱ्यांनी आपण या व्यक्तीशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, “शहरांमध्ये घरभाडे आणि डिपॉजिटची ठेव इतकी वाढली आहे की प्रत्यक्षात किडनी विकावी लागेल यात शंका नाही.” तर आणखी एकाने आयफोन नंतर रुमसाठी किडनी विकणारा कोणीतरी सापडला असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ‘भाऊ, तुम्ही खरंच किडनी विकत असाल तर किंमत सांगा, आम्हाला गरज आहे.’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader