Viral video: काही मंडळी ही फारच जुगाडू असतात. एखादी गोष्ट नाही म्हणून ते रडत बसत नाहीत. उलट ती गोष्ट करण्यासाठी वेगळा पर्याय शोधून काढतात. यालाच आपण रोजच्या भाषेत जुगाड असं म्हणतो. याच पार्श्वभूमीवर काही चिमुकल्यांनी भन्नाट जुगाड तयार केला आहे. या मराठी मुलांनी चक्क डब्यांच्या झाकणांचा ड्रमसेट तयार केला आहे. अन् हो, हा ड्रम सेट ती एकाद्या प्रोफेशनल म्युझिक कॉन्सर्टमध्ये सुद्धा वाजवू शकतो इतका जबरदस्त आहे. विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुलांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराच्या अंगणात दोन लहान मुलं काहीतरी वाजवत असल्याचं दिसत आहे. घरातल्या काही जुन्या भांड्यांपासून त्यांनी हा ड्रमसेट तयार केला. अनेक मोठमोठे संगीत तज्ज्ञ म्हणतात. संगीत हे चराचरात आहे. हातात मिळेल त्या वस्तूचा वापर तुम्ही एखाद्या वाद्यासारखा करू शकता. अन् हिच गोष्ट या चिमुकल्यांनी केलं. त्यांचा हा जुगाडू ड्र्मसेट कुठल्याही प्रोफेशनल वाद्यापेक्षा कमी नाही.
आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचं दु:ख करत न बसता या मुलांनी आहे त्यातूनच आपल्या मनोरंजनाचं साधन तयार केलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे..! बुलेटच्या आवाजानं म्हैस बिथरली अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा व्हायरल VIDEO
हा व्हिडीओ @galsure_village या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आल आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.