Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. तुम्ही लहान मुलांचे डान्स करतानाचे किंवा मजामस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला कविता म्हणतााना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की चिमुकल्याने कशावर कविता केली आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल आणि तो इडली खात आहे. इडली खात असताना तो इडलीवरच गोड कविता म्हणतो. तुम्हालाही या चिमुकल्याची कविता आवडेल. कविता खालील प्रमाणे –

“एक होती इडली
एक होती इडली
ती होती चिडली
ती होती चिडली
धावता धावता सांबारात जाऊन पडली
सांबाप होते गरम
इडली झाली नरम
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे
इडली होती फारच मस्त
आम्ही मुलांनी केली फस्त”

हेही वाचा : धक्कादायक! भर दुकानात तरुणीचा विनयभंग, शरीराला स्पर्श करताच मदतीसाठी किंचाळली पण….; घटनेचा VIDEO व्हायरल

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकला कवितेच्या शब्दांप्रमाणे अभिनय करताना दिसत आहे. हा गोड व्हिडीओ पाहून तु्म्हीही इडलीच्या प्रेमात पडाल. ज्या लोकांना इडली खूप आवडते, त्यांना सुद्धा हा व्हिडीओ खूप आवडेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : फ्रीजमधून पाणी यायला लागलं म्हणून मागे पाहिलं तर…VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

little.man.advay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक होती इडली…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना चिमुकल्याची ही कविता खूप आवडली आहे. काही लोकांनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप गोड आहे ना. हे गाणं तर ऐकून मस्तच लहान वाटलं. गोड गायलं तु मुला” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “तुमची इडली इथे चिडली” आणखी एका युजरने लिहिलेय, ” लहान मुलांचे बोबडे बोल खूपच गोड असतात ,, आणि त्यातून पण अद्वय चा आवाज खूपच छान वाटतो” या चिमुकल्याचे नाव अद्वय आहे आणि त्याचे आईवडिल त्याचे गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अद्वयला हजारो लोक फॉलो करतात आणि त्याच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids poem ek hoti idli on south indian dish idli goes viral on social media ndj