लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या ओळी कानांवर पडताच सगळ्यांना आपलं बालपण आठवतं. लहानपणी अनेकांनी मस्ती, खोडी केलेलीच असते. लहानपणीच्या अशा आठवणी अनेकदा आनंद देतात. म्हणूनच ‘लहान मुले देवाघरची फुले’, असं म्हटलं जातं. लहानपणी केलेली मजा-मस्ती काही औरच असते. लहानपणीच आपण सायकल चालवायला शिकतो. सुरुवातीला थोडं धडपडतो; पण मग पुन्हा आपण जोशात प्रयत्न सुरू ठेवतो. सायकल कशी चालवायची हे आजकाल कोणाला सांगायची गरज पडत नाही. पण, तुम्ही कधी तुमच्या मित्राबरोबर एकच सायकल एकाच वेळी चालवलीय का? नाही ना…

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक सायकल दोन चिमुकले एकाच वेळी चालवतायत… पण ते कसं शक्य आहे, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल… म्हणून नेमका असा कोणता जुगाड या लहानग्यांनी केलाय ते जाणून घेऊ…

हेही वाचा… असा मित्र नसलेलाच बरा! भररस्त्यात मित्राचा पाठलाग केला, वेगात गाडी आली अन्…, पुढच्या क्षणी जे झालं ते धक्कादायक, पाहा VIDEO

सायकल चालवण्याची नवी कोरी पद्धत

लहानग्यांच्या या व्हिडीओनं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतलीत. या व्हिडीओमध्ये एक सायकल दोन शाळकरी मुलं चालवताना दिसतायत; पण सायकल चालवण्याची ही पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा एका पेडलवर, तर दुसरा दुसऱ्या पेडलवर उभा, अशा पद्धतीनं ते दोघं राहून सायकल चालवतोय. अगदी तोल सांभाळत दोघंही काळजीपूर्वक सायकल चालवताना दिसतायत. सायकल चालवण्याची ही पद्धत पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ @hasna_aur__hasana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “वडिलांच्या वयाचा ना तू…”, मॉलमध्ये नको त्या ठिकाणी तरुणीला केला स्पर्श, नराधमाचा संतापजनक VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “मीपण असं लहानपणी केलं आहे.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “खरंच, भारतात टॅलेंटची कमी नाही आहे.” एकानं, “खतरनाक पोरं आहेत”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “असं मी पहिल्यांदाच पाहिलं.”

Story img Loader