लहान मुलांचे मोठ्यांचे अनुकरण करत असलेले अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अगदी जेवायचे कसे इथपासून रस्ता कसा ओलांडायचा इथपर्यंत लहान मुलं प्रत्येक गोष्ट मोठ्यांकडुनच शिकतात. आपल्या आजुबाजूला वावरणारी मोठी माणसंच मुलांचे पहिले गुरु असतात. त्यांच्याकडुन फक्त निरीक्षणातून लहान मुलं अनेक गोष्टी शिकतात. कधीकधी ही लहान मुलं अशी काही कामगिरी करून दाखवतात, जी मोठ्यांनाही जमणार नाही. याचीच प्रचिती येणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं (एक मुलगा आणि एक मुलगी) एका बर्फाळ रस्त्यावरून चालत असलेले दिसत आहेत. तेव्हा रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा त्यांना दिसतो. या खड्ड्यामुळे कोणाचाही अपघात होऊ नये यासाठी ही लहान मुलं जवळ असणारी मोठी दगडं त्या खड्ड्याभोवती ठेवतात. जेणेकरून इतरांना तिथे खड्डा असल्याचे दिसेल आणि अपघात टाळता येईल. लहान मुलांची ही कृती कौतुकास्पद आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा
व्हायरल व्हिडीओ
आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता
भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या वयात इतरांची काळजी करण्याचा हा विचार कौतुकास्पद आहे. या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.