दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यात येतो. ख्रिस्ती बांधवांचा हा मोठा सण असला तरीही प्रत्येक जण हा सण अगदी उत्साहाने साजरा करतो. ख्रिसमसदरम्यान अनेकदा ऑफिसमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात येतात. त्यामध्ये सीक्रेट सांता, ख्रिसमस थीम ठेवून खास पोशाख घातले जातात आणि एकमेकांना भेटवस्तू देण्यात येतात. तसेच चिमुकल्यांसाठी शाळेत भेटकार्ड किंवा काही खास कार्यक्रम ठेवण्यात येतात. चिमुकलेसुद्धा अगदीच आनंदाने त्यांच्या सांताक्लॉजकडे खास भेटवस्तू मागताना दिसतात. सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये चिमुकल्याने एका अनोख्या भेटवस्तूची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@tunguz या एक्स (ट्विटरने) एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात एका चिमुकल्याने सांताक्लॉजकडे खास गिफ्टची मागणी केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रिय सांता, तू कसा आहेस ? मी तर ठीक आहे; पण मला ख्रिसमसला ही भेटवस्तू हवी आहे, असा मजकूर लिहून चिमुकल्याने चक्क हुबेहूब अ‍ॅमेझॉनची लिंक म्हणजेच यूआरएल लिहिली आहे; ज्यात ५० पेक्षा अधिक अक्षरे आहेत. चिमुकल्याने कशा प्रकारे अ‍ॅमेझॉनची लिंक लिहिली ते एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…१००० वर्षातून एकदाच येतो आजचा दिवस? तुमच्याही वाढदिवसाची आकडेमोड करून पाहा, नेमका असं का होतं?

पोस्ट नक्की बघा :

चिमुकल्याने पत्रात लिहिली अ‍ॅमेझॉनची लिंक :

ख्रिसमसमध्ये सांताक्लॉजला पत्र लिहिणे आणि हक्काची भेटवस्तू मागणे ही लहान मुलांची सगळ्यात आवडती गोष्ट आहे. त्यातच अनेक लहान मुले खेळणे, चॉकलेट, कपडे आदी अनेक गोष्टी पत्रात लिहून त्या मिळण्याची अपेक्षा करतात. पण, या चिमुकल्याने तर चक्क ऑनलाइन भेटवस्तूची मागणी केली आणि अ‍ॅमेझॉनची यूआरएल (URL) त्या पत्रात स्वतःच्या अक्षरात लिहिली; जेणेकरून सांता अ‍ॅमेझॉन लिंकवर जाऊन चिमुकल्याला काय हवे ते पाहू शकेल. सध्या ऑनलाइन सामान खरेदी करणे अनेकांना आवडते. मोठ्या माणसांना ऑनलाइन खरेदी करताना पाहून या चिमुकल्यानेही सांताक्लॉजकडे असे अनोख्या स्टाईलमध्ये गिफ्ट मागितले आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @tunguz या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच या पोस्टला “आजकालची मुलं अगदीच सोज्वळ आहेत”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून अनेक नेटकरी ही लिंक अ‍ॅमेझॉनॲपवर टाईप करून कोणता प्रॉडक्ट दिसतोय का हेसुद्धा तपासून पाहत आहेत. तसेच काही जणांना या लिंकवर कोणतीच वस्तू दाखवली नाही हेसुद्धा त्यांनी स्क्रीनशॉट पाठवून कमेंटमध्ये शेअर केली आहे आणि सोशल मीडियावर या खास पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.