Kiley Paul’s Dance: एखादं नवीन गाणं प्रसारित झालं की ते सोशल मीडियावरही खूप चर्चेत येतं. या नवीन गाण्यावर रील बनवल्याशिवाय किंवा अभिनय केल्याशिवाय अनेकांना राहवत नाही. या नवनवीन गाण्यांवर फक्त भारतातील लोकच नाही तर परदेशातील युजर्सही ठेका धरतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केले गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ गाणेदेखील खूप लोकप्रिय झाले आहे. सध्या ‘यिम्मी यिम्मी’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल डान्स करताना दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘यिम्मी यिम्मी’ हे गाणं खूप चर्चेत आहे. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवत आहेत. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vicky kaushal tauba tauba song video the old age home old ladies danced on the song tauba tauba vicky kaushal
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
Kiley Paul's stunning performance on an Indian song
किली पॉलचा भारतीय गाण्यावर जबरदस्त अभिनय; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Success Story Of Nikunj Vasoya
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जेवण बनवतो; वाचा थक्क करणारा ‘त्याचा’ प्रवास
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Khandalyachya Ghatat Gadi Chale Zokaat in mumbais local train is going viral
मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘यिम्मी यिम्मी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. किली पॉलला या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘यिम्मी यिम्मी आग्रहाखातर’, असे लिहिलेले दिसत आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १९ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: बापरे! बाप्पाच्या मूर्तीमध्ये शिरून उंदराने पोखरला बाप्पाचा हात VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्

पाहा व्हिडीओ

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “जबरदस्त भावा, एक नंबर”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सुंदर एक्स्प्रेशन”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली भारतात कधी येणार आहेस”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “काय नाचतोय हा”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.