Kiley Paul’s Dance Video: एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की त्यातील डायलॉग, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘तौबा तौबा’ गाणेदेखील रील्सवर पाहायला मिळत आहे. तसेच आता ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ हे जुने हिंदी गाणेदेखील चर्चेत आले आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स
kaka dance on marathi song bai g pichali Majhi bangadi goes viral on social media
“बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO

किली पॉलचा डान्स चर्चेत (Kiley Paul’s Dance Video)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे लक्षवेधी असून, डान्सच्या स्टेपदेखील सुंदर आहेत. यावेळी किली पॉल खूप सुंदर डान्स करताना दिसतोय. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘ट्रेंडिंग’ असे लिहिलेले दिसत आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘MPSC साठी गेलो पुण्यात…’ गाणं गात तरुणाने मांडली एमपीएससी परीक्षा देणाऱ्या तरुणांची व्यथा; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “आय लव्ह इंडिया”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुझा डान्स पाहून विक्की कौशलनेही कमेंट करायला हवी”; तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप छान गाणं आहे हे”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “भावा तुझा डान्स जबरदस्त”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, किली पॉलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील ‘इल्युमिनाटी’ या गाण्यावरदेखील जबरदस्त डान्स केला होता. तसेच त्याने ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’ या गाण्यांवरही सुंदर डान्स केला होता.

Story img Loader