Kiley Paul’s Dance Video: एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की त्यातील डायलॉग, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘तौबा तौबा’ गाणेदेखील रील्सवर पाहायला मिळत आहे. तसेच आता ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ हे जुने हिंदी गाणेदेखील चर्चेत आले आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा