गेल्या काही दिवसांपासून टांझानियन तरूणाच्या डान्स व्हिडीओंचा भारतात दबदबा कायम आहे. या तरूणाचे हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, सगळीकडेच सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच आता या टांझानियन तरूणावर सुद्धा ‘पुष्पा’ फिवर चढलाय. त्याने नुकताच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर अप्रतिम डान्स केलाय. त्याचा हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या गाण्यातील हुक स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत. सोशल मीडियावर सध्या ट्रेंड सुरू असताना गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड गाण्यांवर व्हिडीओ बनवून चर्चेत आलेला हा टांझानियन तरूण तरी कमा मागे राहिल. किली पॉल याने सुद्धा सोशल मीडियावरील ट्रेंडला फॉलो करत ‘श्रीवल्ली’ या गाण्यातील हुक स्टेप फॉलो करत डान्स केलाय. या व्हिडीओमधली किली पॉलची हटके स्टाइल लोकांना खूप आवडू लागली आहे. मुळ गाण्यातल्या अल्लु अर्जुनच्या स्टाइलला हुबेहुब कॉपी करत त्याने अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणं एन्जॉय केलंय.

आणखी वाचा : संतापलेल्या नवरीने ८ लाख रुपयांचे ३२ वेडिंग गाऊन कापले, पाहा हा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये तो मुळ गाण्यातल्या अल्लु अर्जुनप्रमाणेच हुक स्टेपमध्ये चप्पल निघालेली दाखवतोय. या गाण्यातल चप्पल पायातून निघतानाची हुक स्टेप सध्या खूपच लोकप्रिय होऊ लागलीय. सोशल मीडियावरील प्रत्येकजण या गाण्यावर व्हिडीओ करताना ही हुक स्टेप मिस करत नाहीत. अनेक लोक किलीच्या डान्सची अल्लू अर्जुनच्या डान्सशी तुलना करत आहेत आणि भारतातील आयकॉन स्टार अल्लू अर्जून सुद्धा हा व्हिडीओ पाहून आनंदी होईल, असं म्हणत आहेत. या गाण्यातली हुक स्टेप करून शेवटला त्याने जो धांसू डान्स केलाय तो पाहून हा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा होईल. एकदा हा व्हिडीओ पाहाच.

आणखी वाचा : आयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : असं कुणी करतं का? कपल डान्स करताना चुकली म्हणून तिला सगळ्यांसमोर मारू लागला…

नेहमीप्रमाणे या व्हिडीओतही किली पॉल त्याच्या पारंपारिक मासाई कपड्यांमध्ये दिसून आला. किली हा व्यवसायाने शेतकरी असून तो शेती करतो आणि प्राणी पाळतो. पण त्याच्या आत एक कलाकार दडलेला आहे. त्याने ज्या पद्धतीने गाणी गायली आणि डान्स केले आहे, त्यावरून त्याने लाखो लोकांना त्याच्या प्रेमात पाडलंय. विशेष म्हणजे तो कोणत्याही स्टायलिश लूकमध्ये नाही तर त्याच्या पारंपरिक ड्रेस मासाईमध्ये डान्स करत असतो.

आणखी वाचा : नवरा पलंगावर आरामात झोपला होता, पत्नीने जे केलं ते पाहून त्याची झोपच उडाली, पाहा Viral Video

त्याचा हा नवा ‘श्रीवल्ली’ गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की, आतापर्यंत या व्हिडीओला १८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १.५ मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्याची ही हटके स्टाईल पाहून लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kili paul dances on allu arjuns srivalli song from pushpa film watch viral video google trend today instagram prp