तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एका टांझानियन तरूण किली पॉलचे अनेक डान्स व्हिडीओ तुमच्या नजरेस पडले असतील. गेल्या काही दिवसांपासून टांझानियामधला तरूण किली पॉल हा बॉलिवूडच्या अनेक हिट गाण्यांवर डान्स व्हिडीओ शेअर करत धुमाकूळ घालतोय. हा तरूण टांझानिया देशातला असला तरी अगदी भारतातून सुद्धा त्याचे बरेच फॅन तयार झालेत. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या टांझानियन तरूणाने आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने नुकतंच ट्रेंडमध्ये असलेल्या पुष्पा सॉंग ‘सामी सामी’ या गाण्यावर तुफान डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना खूपच आवडू लागला आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पाहाच.
आदिवासी पेहराव करुन बॉलिवूडच्या वेगवेगळ्या सुपरहिट गाण्यावर डान्स करत किली पॉल हा टांझानियन तरूण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलाय. नुकताच आता त्याचा ‘सामी सामी’ गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘सामी सामी’ या गाण्यावर त्याचे शानदार स्टेप करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर त्याचा हा डान्स परफॉर्मन्स जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या गाण्यावर डान्स करत त्याने आपल्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सनी लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. तो यावेळी अगदी मनापासून डान्स करताना दिसून येत आहेत. या गाण्यातील काही हूक स्टेज सुद्धा अप्रतिमरित्या फॉलो करताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय अजगर रस्ता ओलांडत होता, सर्व वाहने थांबली पण हा काही थांबला नाही
या व्हिडीओमध्ये डान्स करताना त्याचा जो जोश पहायला मिळाला, ते पाहून लोक त्याच्या आणखी प्रेमात पडू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये किली पॉल हुबेहूब गाण्यातल्या हूक स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. किलीचा परफॉर्मन्स पाहून सारेच जण थक्क झाले आहेत आणि सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा : बर्फावर धावणाऱ्या पेंग्विनचा हा VIRAL VIDEO पाहून कुटुंब का महत्त्वाचं आहे हे समजेल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : डान्स करता करता स्टेजवरच भांडू लागल्या मुली, जो सोडवायला आला त्याला सुद्धा धू धू धुतलं!
हा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरील kili_paul नावाच्या अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की आतापर्यंत आता या व्हिडीओ ५.९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेहमीप्रमाणे या ही व्हिडीओमध्ये तो त्याच्या पारंपारिक पेहराव ‘मसाई’मध्ये दिसून आलाय. जवळपास २ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या व्हिडीओचं कोतुक करत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : समोर आवडते पदार्थ ठेवले होते…पण एका चुकीमुळे जे घडलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल
सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पाः द राइज पार्ट 1′ चित्रपटातील रश्मिका मंदाना हिचं ‘सामी सामी’ हे गाणं सध्या ट्रेंड करत आहे. या गाण्याला लोकांची भरपूर पसंती मिळतेय. मोनिका यादवच्या आवाजात गायलेलं ‘सामी-सामी’ हे गाणं लोकांना खूप आवडू लागलं आहे आणि अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी त्यांचे रील शेअर केले आहेत.