तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करता करता एका टांझानियन तरूणाचे डान्स व्हिडीओ कधी तरी तुमच्या नजरेस पडले असतील. हा टांझानियन तरूण असला तरी भारतात त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. किली पॉल असं या तरूणाचं नाव असून सध्या तो सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनलाय. नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या ओह ओह जाने जाना या गाण्यावर थिरकताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या किली पॉलच्या या नव्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत ताजिकिस्तानी अब्दू रोझिक आणि रियाझ अली हे सुद्धा दिसून येत आहेत. या दोघांसोबत त्याने स्क्रीन शेअर करत नवा व्हिडीओ बनवलाय. या छोट्याश्या व्हिडीओमध्ये तिघांनी सलमान खानच्या ओह ओह जाने जाना या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. हा व्हिडीओ रियाझ अलीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा : किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

किली आणि अब्दू आणि अली पेप्पी ट्रॅकवर लिप सिंक करताना दिसतात आणि अचानक ते डान्स मोडमध्ये येतात. या गाण्याच्या हुक स्टेप त्यांनी कॉपी करत हा परफॉर्मन्स सादर केलाय. आम्हाला खात्री आहे की आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडीओप्रमाणे किली पॉलचा हा नवा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल.

आणखी वाचा : हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्सनी य व्हिडीओचा भरपूर घेत व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शन वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी भरून काढला आहे.

Story img Loader