टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. याच मालिकेत आणखी भर घालत या भाऊ बहिणीच्या जोडीमधल्या भावाने बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गाण्यावर लागोपाठ लिपसिंक करून सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. पाहता पाहता त्याचे सर्व व्हिडीओ असंख्य लोकांना पसंतीस पडत आहेत. या भावंडांच्या जोडीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या ‘शेरशाह’ गाण्यातील ‘राता लंबिया’ गाण्यावर लिपसिंक केले होते. त्यानंतर इंटरनेटवर त्यांच्या चाहत्यांची लाटच उसळली आहे. ही लाट अजुनही ओसरण्याचं नाव घेताना दिसून येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या टांझानियातील तरूणाने एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये या टांझानियन तरूणाने अभिनेता रणबीर कपूरच्या ‘चन्ना मेरेया’ या गाण्यावर जबरदस्त लिपसिंक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये, किलीने मूळ गाण्यातल्या रणबीर कपूरप्रमाणेच हुबेहूब इमोशन्स दाखवले आहेत. यात किलीच्या चेहऱ्यावर उदास भाव दिसून येत आहेत आणि गाण्याच्या लिरिक्सवर त्याने मन पिघळवून टाकणारे हावभाव व्यक्त केले आहेत. काही वेळानंतर तो मूळ व्हिडीओमधल्या रणबीरप्रमाणेच उभा राहतो आणि डान्स करतो. त्याच्या ऑन-पॉइंट एक्स्प्रेशनने लाखो लोकांचं मन जिंकलं आहे. आम्ही जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्हीच स्वतः हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : चाकाखाली अडकलेली नोट काढण्यासाठी पठ्ठ्यानं काय शक्कल लढवली पाहा…; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर नवरीचा बहिणीसोबत धांसू डान्स; पाहा हा शानदार व्हिडीओ

सोशल मीडियाचे यूझर्स सध्या किली पॉलच्या तुफ्फान प्रेमात पडलेत. kili_paul नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्यावर तो बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत असता. या आफ्रिकी भावंडांची लोकप्रियता एवढ्या वेगाने वाढत आहे की, हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत तब्बल नऊ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच व्हिडीओमधील त्याचे एक्सप्रेशन्स आणि डान्स पाहून कमेंट्स सेक्शनमध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरूये.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता, चक्क विमानातून निघाली लग्नाची वरात…! चेहऱ्यावर मास्क लावून गाणं गात केला प्रवास

या गाण्यावर लिपसिंक करताना किली पॉलने जबरदस्त एक्सप्रेशन्सने या गाण्याचे भाव व्हिडीओमध्ये उतरवले आहेत. पण त्याची स्टाइलही जबरदस्त आहे. यामुळेच लोक त्याचे व्हिडीओ खूप पसंत करत आहेत. या गाण्यावर अभिनय किली पॉलने इतका सुंदर केलाय की, ते व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शन भरून निघाला आहे. “आश्चर्यकारक अभिनय, मनाला आनंद देणारा,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिलं की, “अतिशय उत्तम…तुम्ही खूप छान काम करत आहात..” तिसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ‘तुझे हावभाव पाहून आम्ही तुझ्या प्रेमात पडलोय.’ बॉलिवूडच्या गाण्यावर लिपसिंक करताना तो कुठेच गडबडत नाही. त्यामुळे भारतात किली पॉलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसून येतेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kili paul lip syncs and dances to ranbir kapoors channa mereya in viral video mind blowing says internet prp