जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एकदा तरी तुमच्या नजरेस टांझानियातील एक तरूणाचे रिल्स दिसले असतीलच… गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर टांझानियन तरूण बॉलिवूडमधल्या ट्रेंडिंग गाण्यांवर वेगवेगळे डान्स व्हिडीओ शेअर करत असल्यामुळे चर्चेत येत आहे. भारतात सुद्धा या तरूणाची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याची बहिण निमा सोबत अनेक कंटेंट शेअर करत केलेल्या एका लिपसिंक व्हिडीओमुळे तो रातोरात सोशल मीडिया स्टार बनला. तेव्हापासून या तरूणाने मागे वळून पाहिलं नाही आणि लागोपाठ वेगवेगळे लिपसिंक आणि डान्स व्हिडीओ शेअर करण्यास सुरूवात केली. नुकतंच या तरूणाने आता बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केलीय. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
किली पॉल असं या व्हायरल झालेल्या टांझानियन तरूणाचं नाव असून आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या डान्स व्हिडीओ आणि लिपसिंक व्हिडीओने लाखो लोकांची मन जिंकली आहेत. त्याचे डान्स मूव्ह्ज पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत. आता त्याने गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी करत प्रेक्षकांवर आपली वेगळीच छाप सोडली आहे. नुकतंच शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओमध्ये किली पॉल गोविंदा, ममता कुलकर्णी, कादर खान आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केलेल्या १९९७ च्या ‘नसीब’ या चित्रपटातल्या एका सीनवर ही डायलॉगबाजी केलीय. गोविंदा आणि कादर खानच्या ‘अरे जा’ या सीनमध्ये किल पॉलने जबरदस्त अभिनय केलाय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्रहीन व्यक्तीची ‘डोळस’ कामगिरी! पाहू शकत नसला तरी स्केटिंग करत दाखवला पराक्रम
या नव्या व्हिडीओमध्ये किली पॉलने ज्या पद्धतीने डायलॉगबाजी करताना इतके जबरदस्त एक्सप्रेशन्स दिलेत की ते पाहून अंगावर काटाच येतो. त्याचे हावभाव आणि दमदार डायलॉगबाजी पाहून बॉलिवूड अभिनेता गोविंदा सुद्धा त्याच्या प्रेमात पडेल, हे मात्र नक्की. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओच्या सुरूवातीला किली पॉलची बहिण नीमा पॉल सुद्धा दिसून येतेय. व्हिडीओची सुरूवात नीमा पॉलने केल्यानंतर किली पॉल त्याच्या अभिनयाला सुरूवात करतो.
आणखी वाचा : हे काय? रॅम्पवॉक करताना मॉडेल अचानक प्रेक्षकाला मारू लागली, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महागाईच्या काळात फक्त ५ रुपयांत इडली डोसा; ‘अम्मा’चं सोशल मीडियावर होतंय कौतूक
हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १.४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊसच पाडलाय. काही युजर्सनी किली पॉलच्या अभिनयाचं कौतुक केलंय. काही युजर्सनी त्यांच्या फर्माइश कमेंट्समध्ये लिहित त्यावर त्याचा एक डान्स व्हिडीओ शेअर करण्याची विनंती केलीय.