बॉलिवूड गाण्यांवरील लिप सिंक व्हिडीओमुळे चर्चेत आलेला टांझानियन तरूण किली पॉलचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आलाय. त्याच्या या नव्या व्हिडीओमध्ये त्याने सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या एका गाण्यावर लिप-सिंक केलं आहे. हे कोणतं गाणं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. अभिनेता आणि गायक अली जफरच्या ‘झूम’ या गाण्यावर त्याने हा नवा व्हिडीओ तयार केलाय. तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर हे गाणं एकदा तरी कानावर पडलं असेलच. या गाण्याची क्रेझ आता टांझानियन तरूण किली पॉल आणि त्याची बहीण नीमा यांच्यावरही चढली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये किली उत्साहीपणे ‘झूम’ या सुपरहिट गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याची बहीण नीमा पॉलही त्याच्यासोबत झळकलेली दिसून येतेय. पाकिस्तानी गायक अली जफरचे झूम हे गाणे रिलीजच्या ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावरील नेटिझन्स आणि बॉलीवूड सेलेब्स देखील या गाण्याची चर्चा करताना दिसून येत आहेत. प्रत्येक जण झूम या गाण्यावर वेगवेगळे रिल्स शेअर करताना दिसून येत आहेत. मग यात टांझानियन तरूण किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल कसे मागे राहतील?
आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले
व्हिडीओमध्ये किली पॉल आणि नीमा पॉल या दोघा बहीण-भावाने आपल्या अप्रतिम एक्सप्रेशन्स देत लाखो लोकांना आपल्या प्रेमात पाडलंय. नेहमीप्रमाणे दोघेही या व्हिडीओमध्ये पारंपारिक वेशभूषेत दिसून आले. किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल यांची बरीच मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या या नव्या व्हिडीओलाही लोक भरभरून प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : माणूसकी अजुनही जिवंत! कारखाली अडकलेल्या बाईक चालकाच्या मदतीला लोकांची गर्दी
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : खाली डोकं, वर पाय! हत्तीचा स्तब्ध करणारा स्टंट; VIRAL VIDEO पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण
किली पॉल याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.५ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.