Killy Paul Dance: जगभरातील रील्स बनवणारे युजर्स नेहमीच ट्रेंडिंग गाण्यांच्या शोधात असतात. विविध देशांतील विविध भाषांच्या गाण्यांवर ते आपल्या हटके पद्धतीने रील्स बनवतात. भारतातील विविध भाषांतील गाणीही सातत्याने चर्चेत असतात; ज्यावर केवळ भारतीयच नाही, तर परदेशातील रील्स स्टारही आवर्जून रील्स बनवतात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ ही गाणी चर्चेत आहेत. दरम्यान, अशाच एका गाण्यावर परदेशातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रील बनवताना दिसत आहे.

अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर तमीळ भाषेतील बीस्ट या चित्रपटातील ‘अरबी कुथू’ गाणे खूप चर्चेत होते. त्यावर अनेकांना रील्स बनवताना आपण पाहिले असेल. दरम्यान, आता या चर्चेत असलेल्या गाण्यावर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष
Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral
Video: ‘आले तुफान किती…’ म्हणत नुपूर शिखरेचं पत्नी आयरा खानबरोबर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना

भारतातली विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने ‘अरबी कुथू’ या गाण्यावरही रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये किली पॉल त्याच्या पारंपरिक वेशात असून त्याने चक्क टी-शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे. परंतु, तो डान्स नेहमीप्रमाणे हटके आणि सुंदर पद्धतीने करताना दिसत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून अनेक भारतीय युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘माणुसकी अजूनही जिवंत’… पुरातून वाहून जाणाऱ्या गाईला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किलीभाऊ ऑन रॉक.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “किली तुला खूप खूप प्रेम आमच्याकडून.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “एक नंबर भावा.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.”

Story img Loader