Killy Paul’s Dance: एखादे नवीन गाणे प्रदर्शित झाले की, ते सोशल मीडियावरही तितकेच चर्चेत येते. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणीदेखील खूप लोकप्रिय झाली आहेत. या गाण्यांवरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने सध्या चर्चेत असलेल्या मल्याळम गाण्यावर डान्स केलेला आहे. किली पॉलचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील इल्युमिनाटी हे गाणेदेखील सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहेत. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवीत आहेत. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song
“बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
A 95 year old woman Show her remarkable dancing skills Video Shared by IRAS Ananth Rupanagudi must watch heartwarming clip
कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन
Aishwarya narkar avinash narkar dance on south song netizen comments viral video
“नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
brother sister present amazing lavani
Video : बहीण भावांनी केला एकच कल्ला! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ एकदा पाहाच
The man beats Kartik Aaryan and Vidya Balan with an amazing dance performance of the song 'Ami Je Tomar' from Bhool Bhulaiyaa Video Viral
जिंकलंस भावा! ‘आमी जे तोमार’ गाण्यावर तरुणाने सादर केलं अप्रतिम शास्त्रीय नृत्य, थेट कार्तिक आर्यनला दिली टक्कर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘इल्युमिनाटी’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: शेवटी शिक्षण महत्त्वाचं! शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यांच्या इच्छाशक्तीसाठी…”

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “किली पॉल रॉक.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “किली तुझा डान्स खूप मस्त आहे.”