उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन याची पत्नी गेल्या ७ महिन्यांपासून बेपत्ता आहे. मार्च २०१६ मध्ये त्याच्या पत्नीला एका कार्यक्रमात शेवटचे पाहिले गेले होते त्यानंतर मात्र ती कोणालाच दिसली नाही. किम जाँग हा अत्यंत क्रूर असा हुकूमशहा मानला जातो. त्याच्या क्रूरतेच्या गोष्टी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत येत असतात. पण त्याची पत्नी रि- सोल-जू ही गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे. ती कुठे गेली, कुठे आहे याबद्दल कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. काहींच्या मते किमने तिला ठार केले आहे.
किमच्या बहिणीशी रिचे वाद सुरू होते. हे वाद विकोपाला गेल्याच्याही चर्चा आहे आणि याच रागातून या विक्षिप्त हुकूमशहाने आपल्या पत्नीचा खून केला आहे असे ठाम मत अनेकांनी मांडले आहे. किम जाँग हा अत्यंत क्रूर हुकूमशहा मानला जातो. आतापर्यंत अनेक क्षुल्लक कारणांसाठी त्याने आपल्या सहका-यांना मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या आहे. काहीच दिवसांपूर्वी चर्चा सत्रात डोळा लागलेल्या एकाला तोफेच्या तोंडी त्याने दिले होते. त्यामुळे आपल्या पत्नीसोबत तो तसेच काही करु शकतो असे म्हणत अनेकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण काहिंच्या मते किमची पत्नी ही गर्भवती राहिल्याने ती लोकांसमोर येत नसल्याचे सांगितले जात आहे. किमची पत्नी रि ही याआधी गर्भवती राहिली होती तेव्हा ती वर्षभर लोकांसमोर आली नव्हती त्यामुळे कदाचित ती जीवंत असू शकते अशी पुसटशी आशा अनेकांना वाटत आहे. नक्की तिच्याबाबतीत काय झाले हे कोणाच माहित नाही त्यामुळे सध्या तरी ती सोशल मीडियामुळे चर्चेत आहे. पण उत्तर कोरियाच्या क्रूर हुकूमशहाच्या रागापासून किमान तिची तरी सुटका व्हावी अशी प्रार्थना सगळेच करत आहेत.