Viral Video: भारत हा अनेक तीर्थक्षेत्रांमुळे पवित्र देश मानला जातो. येथील प्रत्येक राज्यात किमान दोन-तीन तरी पवित्र तीर्थस्थाने आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगे, अमरनाथ, चारधाम, वैष्णोदेवी यांसारख्या विविध तीर्थस्थानांना भाविक वर्षातून एकदा तरी आवर्जून भेट देतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, अनेक भाविक आपल्या कुटुंबीयांसह तेथे जात आहेत. परंतु, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने प्रचंड गर्दी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हल्ली समाजमाध्यमांमुळे दुर्मीळ भागातील व्हिडीओ, फोटो पाहणेदेखील शक्य झाले आहे. आता असाच एक चारधाम यात्रेतील व्हिडीओ समोर आला आहे. त्यात लाखो भाविक गर्दीत अडकल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वर @Ajit Singh Rathi यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, चारधाम यात्रेतील यमुनोत्री धाम येथे लाखो भाविक डोंगराळ भागात असलेल्या एका धोकादायक रस्त्यावर उभे आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने संताप व्यक्त करीत पोस्टवरील कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा यमुनोत्री धाम येथील काल संध्याकाळचा व्हिडीओ आहे. पाहून कोणालाही भीती वाटेल. एवढी गर्दी येथे यामुळे झालीय; कारण- या ठिकाणी एका दिवशी किती भाविक यावेत याची काहीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. हे दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का? तेव्हा यांच्याकडे काहीतरी नवीन कारण तयार असणार… कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. मग ते देवाच्या ओढीने आलेले भाविक असले तरीही!” असे लिहून पोस्ट शेअर करणाऱ्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.
पाहा व्हिडीओ:
काल (१० मे) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी दोन दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने भाविक यमुनोत्रीला पोहोचले. बद्रीनाथ धामचे दरवाजे उद्या (१२ मे) उघडण्यात येणार आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील अनेकदा चारधाम यात्रा, वैष्णोदेवी यांसारख्या प्रसिद्ध तीर्थस्थानांवर स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
चारधाम यात्रेची भाविक करतात प्रतीक्षा
हिवाळ्यात मुसळधार बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे चारधाम यात्रा दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भाविकांसाठी बंद केली जाते. मग ती पुढील वर्षी पुन्हा एप्रिल-मेमध्ये सुरू होते. दर उन्हाळ्यात होणाऱ्या चारधाम यात्रेच्या प्रारंभाची स्थानिक लोकही वाट पाहत असतात. सहा महिने चालणाऱ्या या प्रवासात देश-विदेशांतून येणारे लाखो भाविक आणि पर्यटक हे स्थानिकांसाठी रोजगार आणि उदरनिर्वाहाचे साधन आहे. म्हणूनच चारधाम यात्रा हा गढवाल हिमालयीन अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते.