संघर्ष कोणाला चुकला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतो. आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी त्याचा निर्भीडपणे सामना कसा करावा, काहीही झाले तरी इतरांबरोबर नेहमी चांगले वागले कसे वागावे, दुसऱ्यांना मदत कशी करावी हे दर्शवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक दयाळू कंडक्टर रस्त्यावर पेन विक्री करणाऱ्या वृद्धाची मदत करताना दिसत आहे आहे. व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
व्हायरल व्हिडीओ पनवेल हायवे येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती रस्त्यावर पेन्सिल आणि पेन विक्री करत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एक एसटी बसजवळ हा वृद्ध व्यक्ती पेन विकत आहे. त्या बसचा कंडक्टर त्या वृद्ध व्यक्तीकडून पेन खरेदी करत आहे. तसं पाहायला गेलं तर हा एक साधा व्हिडीओ आहे ज्यामध्ये एका ग्राहक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करताना दिसत आहे पण थोड संवेदनशीलपणे भावनेने व्हिडीओ पाहिला तर नीट चालता येत नसतानाही कष्ट करून चार पैसा कमावणा एक वृद्ध आणि वृद्ध व्यक्तीची दया आल्याने त्याच्याकडून पेन खरेदी करणाऱ्या कंडक्टराच्या मनाचा मोठेपणा तुम्हाला नक्की दिसेल.
हेही वाचा – बापरे! क्षणार्धात अख्खा डोंगर कोसळला, सैरावैरा धावत सुटले लोक, काळजात धडकी भरवणारा Video Viral
perfect_clickers__ नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पनवेल हायवे पेन्सिल आणि पेन विकणारा म्हातारा. त्याचा संघर्ष खरा आहे. अक्षरशः त्याला नीट चालता येत नाही पण तरीही तो आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी पेन आणि पेन्सिल विकतोय. आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही. लोकांशी चांगले वागा आणि एकमेकांना मदत करा.”
व्हिडीओन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. कष्ट करून चार पैसे कमावणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे कौतूक केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, आपले बरेच एसटी कर्मचारी हे गरीब घरातून या सेवेत आलेले आहेत. त्यामुळे ते या गोष्टीला लगेच समजून घेऊ शकतात. पण दुर्दैव हे ज्यांना जसा म्हणावं तसा मान-सन्मान भेटत नाही, तो भेटला पाहिजे असे माझे प्रमाणिक मत आहे”
हेही वाचा – बर्गरचा आस्वाद घेत होता तरुणी तेवढ्यात सिगल पक्ष्यांनी केला हल्ला, थरारक घटनेचा Video Viral
“एक गरीब माणूसच गरीब माणसाची किंमत समजू शकतो” असे दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले. तिसरा म्हणाला,”यांना सहज मदत करा…”काही नाही घेतलं तरी चालेल. कारण एवढ्या उन्हात हा माणूस पेन विकत असतो… कदाचित दिवसाची पोटासाठी ची मिळकत मिळाली तर आराम तरी करेल..” चौथा म्हणाला, “बस कंडक्टर साहेब, तुम्ही धन्य आहात”