King Cobra Bite On Eye Video Viral : सापला पाहिल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटतो. त्या प्रसंगी त्याला हात लावणं तर दूरच; पण त्याच्या जवळ जाण्याचीही हिंमत अनेक जण करू शकत नाहीत. कारण- त्याच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे खासकरून विषारी सापांपासून सर्व जण अंतर ठेवून राहतात. पण, सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत एक व्यक्ती चक्क भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाच्या डोळ्यांत डोळे घालून बघण्याची हिंमत करताना दिसतायत. पण, यावेळी साप त्यांच्याबरोबर असे काही करतो की, ते पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा भयावह व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल होतोय.

व्यक्तीच्या डोळ्याला सापाने केला दंश

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका टेबलावर एक भलामोठा किंग कोब्रा साप फणा काढून बसलेला आहे. त्याच्यासमोर खुर्चीत एक वृद्ध व्यक्ती बसलेली आहे. यावेळी ती व्यक्ती सापाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहू लागते. काही सेकंद असेच पाहत असताना ती हळूहळू आपला चेहरा सापाच्या तोंडाजवळ घेऊन जाऊ लागते. असे करतानाच साप फणा बाहेर काढतो आणि ती व्यक्ती जवळ येताच अचानक तिच्या डोळ्यात दंश करतो. निमिषार्धात हे असे काही घडले की, कोणाला काही त्याचा अंदाजच आला नाही. त्या व्यक्तीच्या डोळ्याला सापाने दंश केला. या भयावह घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण, “काय हौस होती, नको त्या गोष्टी करायची”, असे म्हणत आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस

सापाने व्यक्तीच्या डोळ्यावर केला दंश, धडकी भरवणारा व्हिडीओ (King Cobra Attack Video)

हा व्हिडीओ @therealtarzann या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. तर, हजारो लोकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की, आणखी करा सापाबरोबर मस्ती. दुसऱ्याने लिहिले की, मी त्या काकांना होत असलेल्या वेदना समजून घेऊ शकतो. आणखी एकाने लिहिले की, मित्रांनो, तो एक तज्ञ आहे आणि त्याला ४२ वेळा सापांनी जखमी केले आहे. पण हा व्हिडीओ पाहून तु्म्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.