Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. आता विचार करा जर किंग किंग कोब्रा आणि अजगर समोरा-समोर आले तर काय होईल. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघे एकमेकांसमोर आले आहे. त्यानंतर किंग कोब्रा आणि अजगरात भयंकर युद्ध झालं असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शेवटी मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं तुम्हीच पाहा

सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भांबेरी उडते, त्यात कोब्रा आणि अजगर या सापांची प्रजाती अत्यंत विषारी मानली जाते. मात्र हेच विषारी साप समोरा समोर आले आणि भयंकर घडलं. अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखाद्या प्राण्याची शिकार करतानाही तुम्ही अजगराला पाहिलं असेल. अजगराचं नाव काढलं तरी अंगाला घाम फुटतो. अशातच किंग कोब्रा या अजगराच्या तावडीत सापडतो आणि तिथेच तो संपतो.

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कोब्रा अजगराला दंश करण्याचा प्रयत्न करत होता. पण अजगरानं त्याचा जबडा पकडला आणि त्याच्या पूर्ण शरीरावर पीळ घातला. त्यामुळे काही केल्या कोब्राचं विष बाहेर येईना आणि शेवटी गुदमरून सर्वात विषारी सापाचा अंत झाला. अजगरानं हुशारी दाखवत अवघ्या काही मिनिटात एका खतरनाक सापावर सहज विजय मिळवला. शेवटी मृत्यूच्या खेळात अजगराचा विजय झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पैठणीसाठी काही पण! कोल्हापुरात पैठणीसाठी बायकांमध्ये राडा; होम मिनिस्टर स्पर्धेतील VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rijeshkv_80 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करुन आपलं पोट भरत असतात. बऱ्याचदा ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात. वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत.सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जंगलाचा हाच नियम आहे” तर आणखी एकानं म्हंटलंय, “अजगर हा अजगर असतो.”