कधी कधी काही गोष्टी अशा घडतात की त्यावर विश्वास ठेवणं खूपच अवघड होऊन जातं. सापांच्या भांडणाचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. किंग कोब्रा हा अत्यंत घातक साप मानला जातो. त्याच्या एका दंशाने देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. या सापाचं विष खूपच घातक असतं. त्यामुळे सर्प मित्र देखील या सापाला पकडताना खूपच काळजी घेतात. या सापाला हात लावणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. जेव्हा हेच तीन खतरनाक किंग कोब्रा एकत्र येतात, तेव्हाचे अद्भुत दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून कदाचित तुमचाही थरकाप उडेल.

कोब्रा, अजगर आणि इतर प्राणी दिसणं हे दृश्य काही नवं नाही. मात्र एकाच ठिकाणी तीन खतरनाक कोब्रा दिसणं, हे दृश्य मात्र दुर्मिळच. मोठ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या किंग कोब्राला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जेव्हा हेच तीन खतरनाक कोब्रा एकत्र आल्यानंतर काय घडतं हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहण्यासारखा आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर या तीन किंग कोब्रांची एक बैठकच सुरू आहे की काय, असा भास होऊ लागतो. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्याने हा व्हिडीओ पाहू लागले आहेत.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
The increasing number of illegal political hoardings is alarming High Court expresses concern while issuing contempt notices to political parties Mumbai news
बेकायदा राजकीय फलकांची वाढती संख्या भयावह; राजकीय पक्षांना अवमान नोटीस बजावताना उच्च न्यायालयाची उद्विग्नता

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक जंगल परिसरात तीन किंग कोब्रा साप हे एकमेकांसमोर आहेत. या तीनही किंग कोब्रा सापांनी आपला फणा काढत डोलत होते. जणू काही यातल्या कुणी एकाने जरी हल्ला करण्यास सुरूवात केली त्याला प्रतिकार करण्याच्या तयारीतच होते. हे तीनही किंग कोब्रा एकमेकांना पाहून घुरघरत होते. हे सारं चित्र पाहून असं वाटत होतं की आता यातला एक तरी किंग कोब्रा पिसळणार आणि हल्ला करणार, मग रंगणार तीन किंग कोब्रांची झुंज. तुम्हाला ही असं वाटत असेल तर थोडं थांबा. कारण या व्हिडीओमध्ये तसं काहीही घडत नाही. नेमकं काय होतं पुढे, पाहा हा VIRAL VIDEO

आणखी वाचा : विषामुळे नव्हे तर सौंदर्यामुळे चर्चेत आलाय हा विषारी साप, काय आहे रहस्य, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर दिल्लीतील तरुणीचा जबरदस्त डान्स

हे तीनही किंग कोब्रा फणा काढत एकमेकांना पाहून घुरघुरत आहेतच, मात्र ते कुणावरील हल्ला करत नाहीत. हे तीन किंग कोब्रा एकमेकांशी जणू काही एखाद्या विषयावर गंभीर चर्चा करत आहेत की काय, असं वाटू लागतं. या तीन किंग कोब्राच्या मिटींगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ‘हेलीकॉप्टरयात्रा‘ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नऊ महिन्याच्या बाळाचे ‘हे’ पहिले शब्द ऐकून फक्त पालक नव्हे तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतक आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. हा व्हिडीओ मात्र कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. या कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

Story img Loader