Cobra Snake Leopard Fight Video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. आता विचार करा जर किंग कोब्रा आणि बिबट्या समोरा-समोर आले तर काय होईल. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघे एकमेकांसमोर आले आहे.
अनेकदा इकडं आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे दोन्ही बाजूंनी संकट येतात किंवा दोन्ही मार्ग बंद होतात अशावेळी नेमकं काय करावं ते समजत नाही. यामध्ये तुम्हालाही कळलं असेल दोघेही खतरनाक प्राणी आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या आणि किंग कोब्रा एकमेकांसमोर आहेत,बिबट्या झाडावर चढलेला दिसून येत आहे. तर झाडाच्या खाली असलेल्या दुसऱ्या झाडाच्या खोडावर एक किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसतोय.
‘शिकार करो या शिकार बनो’
बिबट्या कोब्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. बिबट्याला पाहून कोब्रा आणखीच फणा काढतो. अंगावर झेपावत असलेल्या बिबट्याचा कोब्रा खंबीरपणे सामना करतो. अगदी काही सेकंदाच्या युद्धाचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video: बापरे! चालत्या ट्रेनच्या छतावर तरुणाची स्टंटबाजी; मध्येच पाय घसरला अन्..VIDEO व्हायरल
जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करुन आपलं पोट भरत असतात. ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात. वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत.सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात.