King Cobra Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात विषारी साप किंग कोब्राचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. घरातील टॉयलेटमध्ये तर कधी घराच्या शॉवरवर किंग कोब्रा लटकल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आताही अशाच प्रकारचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कारण एका घराच्या भिंतीत लपलेल्या किंग कोब्राची शेपटी पकडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला अन् पुढं जे घडलं ते पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. किंग कोब्राचा हा भयानक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका घरातील भिंतीच्या विटा बाहेर निघाल्या आहेत. या भिंतीत एक विशाल किंग कोब्रा लपून बसला आहे. त्याच्याजवळ असणारी लोक त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एका व्यक्तीने या सापाला पकडण्यासाठी भिंतीत हात टाकला. त्यानंतर तो किंग कोब्रा प्रचंड वेगाने भिंतीच्या बाहेर आला. हे दृष्य इतकं खतरनाक आहे की, कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने किंग कोब्राची शेपटी पकडली.
इथे पाहा किंग कोब्राचा खतरनाक व्हिडीओ
किंग कोब्राला पकडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, किंग कोब्रोला पकडल्यानंतर त्या व्यक्तीला जराही भीती वाटली नाही. मात्र, सापाला हात लावताच तो दुसऱ्या व्यकीच्या अंगावर धावून जातो, हे थरारक दृष्य पाहून अनकांचा थरकाप उडाला आहे. सापाचा हा व्हिडीओ @Snake_rescue_khargone नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. किंग कोब्रा किती खतरनाक असतो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना याचा अंदाज आला आहे.