साप हा एक असा सरपटणारा प्राणी आहे ज्याची सर्वांनाच भीती वाटते. त्यामागे कारणंही तशीच आहेत. सापाला जगातील सर्वात धोकादायक सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक मानले जाते. कारण तो विषारी असतो, त्याच्या दंशाने माणसाचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. म्हणून केवळ माणूसच नाही तर अनेक प्राणीदेखील सापापासून अंतर ठेवून असतात. पण हल्ली साप आता मानवी वस्तीमध्येही कुठेही जाऊन लपताना दिसायला लागले आहेत. अनेकदा हे साप अशा ठिकाणी लपून बसतात की कोणाला ते सहसा दिसणारही नाहीत. अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.

व्हिडीओमध्ये एक विषारी किंग कोब्रा जातीचा भलामोठा साप पाइपामध्ये लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक भला मोठा किंग कोब्रा साप एका पाइपमध्ये लपून बसलेला असतो, या वेळी एक रेस्क्यू टीम त्याला पकडताना दिसतेय, या टीममधील एकजण त्याला पाइपमध्ये शोधण्यासाठी म्हणून मोबाइलची बॅटरी ऑन करतो आणि व्हिडीओ शूट करू लागतो. या वेळी साप पाइपमधून फुसफुस आवाज करत बाहेर पडतो आणि हल्ल्याच्या इराद्याने फणा वर काढतो.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Vineeta Singh says Ek crore to aap ek ghante mein kama lete ho (1)
Video: “तासाला १ कोटी कमावता, मग इथे…” ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल अन्…

हा व्हिडीओ @WildLense_India या ट्विटर अकाउंटवर १३ मे रोजी पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सावध राहा. १९ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पाइपमध्ये एक भलामोठा किंग कोब्रा साप लपून बसला होता. या वेळी एक व्यक्ती त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो फणा वर काढत हल्ला करतो. या वेळी साप फुसफुस आवाज करत घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. जो आपल्याला व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येतोय. सध्या हा व्हिडीओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत.

या व्हिडीओला आत्तापर्यंत शेकडो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तसंच काही युजर्सनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, व्हिडीओ पाहून अंगावर काटे आले…,खूप भीतीदायक आहे हे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, हे खूप भयानक आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील घाबरलात का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Story img Loader